श्री ढोकेश्‍वर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेला  टाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:49 AM2017-09-30T00:49:42+5:302017-09-30T00:49:52+5:30

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभागातील जयस्तंभ  चौकमधील प्रशस्त जागेत गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या  श्री ढोकेश्‍वर मल्टी स्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीला  अखेर टाळे लागले. त्यामुळे, शहरासह तालुक्यातील ठेवीदारांचे  ४0 लाख अडकले आहेत. 

Mr. Dhokeshwar Urban Co-op. Credit Society's branch toll! | श्री ढोकेश्‍वर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेला  टाळे!

श्री ढोकेश्‍वर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेला  टाळे!

Next
ठळक मुद्देमूर्तिजापूर शहरातील ठेवीदारांचे ४0 लाख  अडकले!ऑक्टोबरमध्ये सुरू झाली होती क्रेडिट सोसायटी

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभागातील जयस्तंभ  चौकमधील प्रशस्त जागेत गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या  श्री ढोकेश्‍वर मल्टी स्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीला  अखेर टाळे लागले. त्यामुळे, शहरासह तालुक्यातील ठेवीदारांचे  ४0 लाख अडकले आहेत. 
 नाशिक येथील मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेने संपूर्ण  विदर्भासह इतर ठिकाणी आपले जाळे पसरविणे सुरू केले.  विविध आमिषे देऊन व मोठय़ा व्याज दराचे प्रलोभन देऊन  ढोकेश्‍वर अर्बनच्या शाखेचे थाटात उद्घाटन करून ठेवी घेणे  सुरू केले. ऑक्टोबर २0१६ मध्ये सुरू झालेल्या मूर्तिजापूर  शाखेनेसुद्धा सर्वसामान्यांकडून प्रलोभन दाखवून ठेवी घेणे सुरू  केले. प्रशस्त इमारत व इन्टिरियल डेकोरेशन बघून, मूर्तिजा पूरच्या भोळ्या जनतेने लालसेपोटी आपल्या ठेवी ठेवल्या.  बँकेचे व्यवस्थापक यांनीसुद्धा आपली घामाची रक्कम व्याजाच्या  लालसेपोटी बँकेत ठेवली; परंतु इतर ठिकाणी सुरू असलेली  कुजबुज व्यवस्थापकाच्या कानी पडताच त्यांनी स्वत:च्या जमा  असलेल्या रकमेवर कर्ज काढून स्वत: सुरक्षित राहिले.  मिळालेल्या माहितीनुसार याच संस्थेच्या याच पतसंस्थेच्या  जवळपास नऊ शाखा पोलिसांनी सील केल्या. ३0 च्या जवळ पास शाखा बंद पडल्या. नजीकच्या दर्यापूर शाखेतसुद्धा दोन  कोटी रुपयांच्या जवळपास रक्कम अडकून पडल्याची माहिती  आहे. या संस्थेचे पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक (एम.डी.) सं तोष पोपटराव काळे हे सध्या कारागृहात आहेत. सदर शाखेत  जमा असलेली रक्कम ही अकोला येथे शाखेत जमा करण्यात  आली आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून शाखेला टाळे  लागल्यामुळे लोकांना शंका आली व लोकांनी स्वत:च्या जमा  असलेल्या रकमेकरिता चकरा मारणे सुरू केले आहे. मूर्तिजा पूरवासीयांचा हा आकडा ५0 लाखांपर्यंत असल्याची माहिती  आहे. या मोबदल्यात फक्त साडेसात हजारांचे कर्ज वाटप आहे. 

Web Title: Mr. Dhokeshwar Urban Co-op. Credit Society's branch toll!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.