मृदुल, सृष्टी, सलोनीची आघाडी
By admin | Published: September 21, 2016 01:59 AM2016-09-21T01:59:13+5:302016-09-21T01:59:13+5:30
अकोला येथे राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा.
अकोला, दि. २0- महेश भवन येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारी सायंकाळपर्यंंंंत चार फेरी खेळल्या गेल्या. मृदुल देहणकर, सृष्टी पांडेय, सलोनी सपकाळ यांनी आपापल्या गटामध्ये आघाडी मिळविली होती.
१४ वर्षांंंंआतील मुलींच्या गटात मृदुल देहनकर, अनन्या गुप्ता, नारायणी अदाने, ईशा सारडा, श्रेया ठाकरे यांनी आघाडी घेतली. १७ वर्षांंंंआतील गटात सृष्टी पांडे, युती पटेल, सुराना शैलेंद्र, नीती तातिया, मुक्ताई देसाई यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले. १९ वर्षांंंंआतील गटामध्ये सलोनी सपकाळ, रुतुजा बक्षी, विश्वा शाह, सोनल मानधना, खुशी गोसावी यांनी आघाडी कायम ठेवली.
मुलांच्या गटातील लढती उत्कंठावर्धक ठरल्या. शेळके, वेदांत पानसरे, श्रीराज भोसले यांनी प्रत्येकी दोन गुण मिळविले. ओम खारोळे आणि आर्यन शाह चौथ्या व पाचव्यास्थानी राहिले. १७ वर्षांंंंआतील गटात हर्षित राजा, निशित सिंग, पृथू देशपांडे, राहुल शुक्ला, ओम वितळकर, १९ वर्षांंंंआतील गटात शैलेष द्रविड, सुयोग वाघ, इंद्रजित महिंद्रकर, हर्ष, समीर यांनी आघाडी घेतली.
स्पर्धेत राज्यातील आठ विभागांतील २४0 खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेचा समारोप गुरुवार, २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेतील विजेते तेलंगणा येथील रंगारेड्डी जिल्ह्यात होणार्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.