महावितरण, बँक व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास नकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:47+5:302021-05-20T04:19:47+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या महावितरण, बँका व कृषी विभागाचे कर्मचारी ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या महावितरण, बँका व कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी लॉकडाऊनमध्येही जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. या कर्मचारी व अधिकारी वर्गाचा थेट जनतेशी संपर्क येतो. त्यामुळे या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लसीकरण करावे, असे पत्र सर्व जिल्हाधिकारी यांना या विभागाच्या राज्य विभागाने काही दिवसांपूर्वीच दिले आहे.
जिल्हाधिकारी सकारात्मक, मात्र, आरोग्य विभाग उदासीन
जिल्हाधिकारी पापळकर अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्यास सकारात्मक आहेत. मात्र, आरोग्य विभाग इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यास तयार नाही. राज्य शासनाचा एक विभाग दुसऱ्या विभागाचे ऐकण्यास तयार नसल्याने पत्र देऊन उपयोग काय? असा प्रश्न अत्यावश्यक सेवेमध्ये येणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून उपस्थित होत आहे.
महावितरण, बँक, कृषी विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना लस द्यावी. याकरिता आपण सकारात्मक आहोत. तसे पत्र काढले आहे. परंतु, आरोग्य विभाग इतर विभागाच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या लसीकरणास तयार नसल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी