महावितरणचा प्रभारी कार्यकारी अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 04:26 PM2017-10-13T16:26:45+5:302017-10-13T16:29:24+5:30
अकोला : वाणिज्यीक विज जोडणी देण्यासाठी एका उप कंत्राटदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करणाºया महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन शालीग्राम जानोकार यास लाचलूचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने शुक्रवार, १३ आॅक्टोबर रोजी सापळा रचून रंगेहात अटक केली. गत १८ सप्टेंबर रोजी एका कंत्राटदारास वर्कआॅर्डर देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ग्रामीण विभागाचा कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर याला अटक करण्यात आली होती. उंबरकरच्या जागी कार्यकारी अभियंता पदाची जबाबदारी घेतल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत जानोकार हा देखील ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला.
अकोला येथील एका ४२ वर्षीय उप कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून ‘एसीबी’ने शुक्रवारी हा सापळा रचला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या गजानन शालीग्राम जानोकार (५५) याने २४ दिवसापूर्वीच ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार स्विकारला होता. या काळात एका आईस्क्रिम पार्लरसाठी नवीन विद्युत जोडणी देण्यासाठी मंजूरी देण्याकरीता तसेत मागील सात दिवसांत बाळापूर, बार्शीटाकळी उपविभागातील शेतकºयांच्या कृषीपंपासाठी वीज जोडणीकरीता लागणारे करारपत्र देऊन काम करण्याची परवानगी देण्याकरीता प्रभारी कार्यकारी अभियंता जानोकार याने १० हजार रुपयांची लाच देण्याची मागणी केल्याची तक्रार सदर उप कंत्राटदाराने ‘एसीबी’कडे केली होती. एसीबीने शुक्रवार, १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता कार्यालयात शुक्रवारी दुपारी १.१५ मिनीटांनी सापळा रचण्यात आला. यावेळी जानोकार याने कंत्राटदाराकडून रक्कम स्विकारताच ‘एसीबी’च्या अधिकाºयांनी झडप घालून जानोकारला ताब्यात घेतले. जानोकारकडून लाचेपोटी स्वीकारलेली १० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याला अटक करण्यात आली. एसीबीचे पोलीस उपअधिक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
२४ दिवसांत अडकला दुसरा अधिकारी
महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचा कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर याला १८ सप्टेंबर रोजी एका कंत्राटदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर उंबरकर याला २२ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले. त्यानंतर मुळ अतिरिक्त कार्यकारी अभियंता असलेल्या गजानन जानोकार याला त्याच दिवशी अकोला ग्रामीण विभागाचा प्रभार सोपविण्यात आला होता. पदभार स्विकारल्याच्या २१ व्या दिवशी गजानन जानोकार हा देखील लाच घेतल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकला.