निंभोरा येथील सरपंचाला महावितरणकडून दंडाची नोटीस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:20+5:302021-03-10T04:19:20+5:30
निंभोरा येथ़ील सरपंच सविता गायकवाड यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या विद्युत मीटरमधून बाजूला असलेल्या सेवा सहकारी संस्था निंभोरा यांना अवैधरित्या विद्युत ...
निंभोरा येथ़ील सरपंच सविता गायकवाड यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या विद्युत मीटरमधून बाजूला असलेल्या सेवा सहकारी संस्था निंभोरा यांना अवैधरित्या विद्युत जोडणी करून वीजपुरवठा दिला होता. त्या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य रमेश किसनराव लांडे यांनी उपकार्यकारी अभियंता ग्रामीण उपविभागीय अकोला यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वीज मीटरमधून वीज चोरी होत असल्याची तक्रार दिली. तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली. वीज चोरी होत असल्याने सरपंच सविता गायकवाड यांना पत्र देऊन खुलासा मागविण्यात आला. खुलासा दरम्यान सरपंच गायकवाड यांनी सेवा सहकारी संस्था निंभोरा यांना वीज मीटर वीजपुरवठा केल्याचे कबूल केले. त्यामुळे महावितरण कंपनीने भारतीय वीज कायदा २००३ कलम १२६ अंतर्गत आकारणी केलेले अनुमानित देयक १० हजार ७०९ रूपयांचा भरणा करण्यासाठी नोटीस बजावली आहे.