पिंजर येथील महावितरण कार्यालयात आठ महिन्यांपासून कनिष्ठ अभियंताचा नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:22 AM2021-07-14T04:22:28+5:302021-07-14T04:22:28+5:30
पिंजर येथील महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरू आहे. कनिष्ठ अभियंता नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे चांगले फावले आहे. महावितरणचा कारभार सध्या बाहेरील ...
पिंजर येथील महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरू आहे. कनिष्ठ अभियंता नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे चांगले फावले आहे. महावितरणचा कारभार सध्या बाहेरील कर्मचाऱ्यांच्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे आणि हे बाहेरील कर्मचारी कोणत्याही कामासाठी पैसे घेत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पिंजर येथील वीज कंपनीचे अभियंता मंगेश राणे यांचे येथील कामांकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वसुली करण्यासाठी येथील काही कर्मचाऱ्यांनी खासगी लोकांना नेमल्याची माहिती आहे. पिंजर महावितरण कंपनीवर खासगी लोकांनी ताबा मिळविला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पिंजर येथील वीज कंपनीचे कर्मचारी बाहेरील लोकांना हाताशी धरून कामे करीत असतील तर याची जबाबदारी त्यांची आहे. बाहेरील लोकांचा महावितरण कंपनीशी संबंध नाही. त्यांना कोणताही अधिकार नाही. याबाबत तसे पत्रसुद्धा दिले आहे. तक्रार प्राप्त झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करू.
-समीर देशपांडे, उपकार्यकारी अधिकारी, महावितरण कंपनी, बार्शीटाकळी