महावितरण प्रादेशिक संचालकांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:27+5:302021-07-29T04:19:27+5:30
परिमंडलात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून वीजबिलापोटी जुलै महिन्यात ७०१ कोटी वसुलीचे उद्दिष्ट असून, गत २६ दिवसात १०७ कोटी ...
परिमंडलात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून वीजबिलापोटी जुलै महिन्यात ७०१ कोटी वसुलीचे उद्दिष्ट असून, गत २६ दिवसात १०७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसात उर्वरित ५९४ कोटी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. ढेपाळलेल्या वसुलीला जबाबदार धरत काही अधिकाऱ्यांवर नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार असल्याचे प्रादेशिक संचालक यांनी यावेळी सांगीतले. याचाच भाग म्हणून काही अभियंत्यांवर कर्तव्यात कसूर करण्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना प्रादेशिक संचालकांकडून करण्यात आल्या आहेत.
सप्टेंबरपर्यंत वीजजोडण्यांची कामे पूर्ण करा
यावेळी प्रादेशिक संचालक यांनी उच्च दाब वितरण प्रणालीअंतर्गत देण्यात येणाऱ्या कृषी वीज जोडणीचा आढावा घेतला आणि मार्च २०१८पूर्वी पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांना वीज जोडणी देण्याचे काम सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच एकात्मिक ऊर्जा विकास योजना (IPDS) व पंडित दीन दयाळ उपाध्याय योजना (DDUGJY) या पूर्ण झाल्या असून, या योजनेअंतर्गत असलेली उर्वरित कामे ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.