महावितरणने केला विक्रमी २२,३३० मेगावॅट वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:33 AM2021-03-13T04:33:21+5:302021-03-13T04:33:21+5:30

राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढायला सुरुवात झाली आहे. सोबतच प्रामुख्याने कृषिपंपांद्वारे विजेचा वापरदेखील वाढला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून ...

MSEDCL supplies a record 22,330 MW | महावितरणने केला विक्रमी २२,३३० मेगावॅट वीजपुरवठा

महावितरणने केला विक्रमी २२,३३० मेगावॅट वीजपुरवठा

Next

राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढायला सुरुवात झाली आहे. सोबतच प्रामुख्याने कृषिपंपांद्वारे विजेचा वापरदेखील वाढला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरू आहे. मात्र, मंगळवारी राज्यात मुंबईसह तब्बल २५ हजार २०३ मेगावॅट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८० लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी २२ हजार ३३९ मेगावॅट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला. राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही, हे उल्लेखनीय.

उन्हाळ्यामुळे येत्या एप्रिल व मे महिन्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. त्याप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून तयारी सुरू आहे.

२१,५७० मेगावॅटचा विक्रम मोडला

महावितरणने १९ फेब्रुवारी २०२० रोजी उच्चांकी मागणीप्रमाणे आतापर्यंत २१ हजार ५७० मेगावॅट विजेचा विक्रमी पुरवठा केला होता. मंगळवारी हा विक्रम मोडीत निघाला.

अशी झाली वीज उपलब्ध

महावितरणला दीर्घकालीन करार असलेल्या महानिर्मितीकडून ७७६१ मेगावॉट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून ४२१६ मेगावॉट, अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्ल्यू, साई वर्धा, एम्को आदींकडून ४२०२ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. सोबतच सौरऊर्जेद्वारे १९७४ मेगावॅटसह नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतून ३१६२ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. तसेच कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १७४० मेगावॅट, तर पॉवर एक्सचेंजमधील खरेदीसह मुक्त ग्राहक वीजनिर्मिती स्रोताद्वारे १२५८ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे.

Web Title: MSEDCL supplies a record 22,330 MW

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.