सुटीच्या दिवशीही महावितरण स्वीकारणार वीज देयके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:25+5:302021-08-29T04:20:25+5:30
महावितरणकडून देण्यात आलेल्या महितीनुसार, अकोला जिल्ह्यात महावितरणचे उपविभागीय स्तरावर बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, अकोट, तेल्हारा, अकोला या ठिकाणी १० ...
महावितरणकडून देण्यात आलेल्या महितीनुसार, अकोला जिल्ह्यात महावितरणचे उपविभागीय स्तरावर बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, अकोट, तेल्हारा, अकोला या ठिकाणी १० वीज बिल भरणा केंद्रे सुरू आहेत. सोबतच जिल्ह्यातील ३२ सहकारी पत संस्थांतही वीज देयक भरण्याची सुविधा आहे. जिल्ह्यात गावपातळीवर वीज देयकाची भरणा करण्यासाठी ७६ ठिकाणी ‘महा पॉवर पे’ ची सुविधा आहे. सोबतच वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणकडून ऑनलाइन वीज देयकाची भरणा करण्याची सुविधा दिली आहे. सोबतच महावितरण ‘मोबाइल ॲप’चा वापर करून वीज ग्राहक आपल्या देयकाची रक्कम भरू शकतात. वीज ग्राहक या सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
येत्या काळात थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार असल्याने वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून, पुढील काळात होणारी कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.