हवामानातील बदलामुळे मशागतीच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 08:06 PM2017-05-17T20:06:32+5:302017-05-17T20:06:32+5:30
आलेगाव परिसरातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त
ऑनलाइन लोकमत
आलेगाव : आलेगाव परिसरात ढगाळ वातावरण राहायला सुरुवात झाल्यापासून शेती मशागत कामांना जोर चढला आहे. यावर्षी आलेगाव तथा परिसरात लग्नसराईने एक विक्रमच केला आहे. जवळपास १२ ते १३ हजार वस्ती असलेल्या आलेगावामध्ये एकाच दिवशी सहा ते सात लग्न विवाह होत आहेत.
लग्नांची संख्या दरवर्षीपेक्षा दुपटीने वाढली आहे. लग्न विवाह व यावर्षीच्या विक्रमी तापमानामुळे जवळपास शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. काही नागरिक लग्न सोहळ्यात मग्न आहेत तर काही शेतकरी बांधव शेतीच्या कामात व्यस्त आहेत. वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळी वातावरण राहायला सुरुवात झाली असून उन्हामध्येसुद्धा बदल झालाआहे. शेतकरी स्वत: व मजुरांकडून शेतीची कामे करून घेत असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे. यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू होईल, या आशेने बळीराजा शेतात मेहनत करीत आहेत.