सातही तालुक्यांत मूग खरेदी केंद्र सुरू; शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 03:01 PM2019-10-07T15:01:29+5:302019-10-07T15:01:49+5:30
विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाच्यावतीने मूग खरेदी करण्यात येत आहे.
अकोला: मुगाचा काढणी हंगाम संपल्यानंतर शासनाला जाग आली असून, २ व ३ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील सात तालुक्यांत मूग खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली. तथापि, शेतकऱ्यांनी गरजेपोटी अगोदरच बाजारात मूग विकल्याने या खरेदी केंद्रांवर शेतकºयांचा अल्प प्रतिसाद आहे.
जिल्ह्यातील अकोला, अकोट व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील ज्या शेतकºयांनी १५ सप्टेंबरपासून आॅनलाइन नोंदणी केली, त्या शेतकºयांकडील मूग खरेदी २ आॅक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आली. अकोला तालुक्यात नोंदणी केलेल्या ५०, मूर्तिजापूर तालुक्यातील ६७ पैकी २५ तर अकोट तालुक्यातील नोंदणी केलेल्या १४९३ शेतकºयांपैकी ५० शेतकºयांकडील मूग खरेदी करण्यात येणार आहे. तथापि, शेतकºयांचा प्रतिसादच नसल्याने अकोट व अकोला खरेदी केंद्रावर प्रत्येकी ३ व ५ क्ंिवटलच मूग खरेदी करण्यात आला आहे. ३ आॅक्टोबर रोजी उर्वरित चार तालुक्यांत मूग खरेदी सुरू करण्यात आली आहे. यावर्षीचे हमीदर प्रतिक्ंिवटल ७०५० रुपये आहेत. तथापि, त्यासाठी नाफेडच्या निकषात बसणारा मूग शेतकºयांना विक्रीस न्यावा लागणार आहे. विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाच्यावतीने मूग खरेदी करण्यात येत आहे.
हमीभावाने मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्यासाठीची नोंदणी १५ सप्टेंबरपासून ‘नाफेड’तर्फे सुरू करण्यात आली आहे. मूग विक्रीसाठी नेताना शेतकºयांनी अद्ययावत आॅनलाइन सातबारा, आधार कार्ड लिंक असलेले झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स नोंदणी केंद्रावर आणणे आवश्यक आहे. दरम्यान, मूग व उडीद नोंदणी शेतकºयांना ३० आॅक्टोबरपर्यंत करता येणार आहे. तीन तालुक्यांतील शेतकºयांनी त्यांच्याकडील मूग, उडीद विक्रीसाठी आणावा, अशी माहिती विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा पणन व्यवस्थापकांनी दिली.
नोंदणी केलेल्या सातही तालुक्यांतील शेतकºयांकडील मूग, उडीद खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शेतकºयांनी या केंद्रांवर मूग विक्रीसाठी आणावा, त्यासाठीची नोंदणी ३० आॅक्टोबरपर्यंत सुरू आहे. विक्रीबाबत शेतकºयांना काही अडचणी असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालय अकोला तसेच संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रवीण लोखंडे,
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला.