मुग, उडिद विकला; पण मिळाला नाही हमी दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 04:48 PM2018-09-24T16:48:59+5:302018-09-24T16:50:10+5:30

अकोला : खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीनचे हमी दर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून, मात्र खरेदीचे निकष अद्याप शासनामार्फत निश्चित करण्यात आले नाही.

Mugh, Urad sold; But not get guaranteed rates! | मुग, उडिद विकला; पण मिळाला नाही हमी दर !

मुग, उडिद विकला; पण मिळाला नाही हमी दर !

Next
ठळक मुद्देमूग व उडिद विकला असला तरी, हमी दराने या शेतमालाची खरेदी सुरु करण्यात आली नाही. हमी दराच्या खरेदीचे निकष केव्हा निश्चित करण्यात येणार याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

- संतोष येलकर

अकोला : खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीनचे हमी दर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून, मात्र खरेदीचे निकष अद्याप शासनामार्फत निश्चित करण्यात आले नाही. अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांना कमी दरात मूग व उडिद विकला; पण खरेदीच्या निकषाअभावी शेतकºयांच्या मुग, उडिदाला हमी दर मिळाला नाही. त्यामुळे हमी दराच्या खरेदीचे निकष केव्हा ठरणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीन खरेदीचे हमी दर शासनामार्फत जाहीर करण्यात आले. परंतू जाहीर केलेल्या हमी दरानुसार संबंधित शेतमालाची हेक्टरी किती खरेदी करायची, यासंदर्भात खरेदीचे निकष अद्याप शासनामार्फत निश्चित करण्यात आले नाही. हमी दराने खरेदी सुरु करण्यात आली नसल्याने, बाजारात कमी दरात शेतकºयांना मुग, उडिद विकावा लागला. पिकांवरील फवारणी, निंदण, मजुरी व इतर खर्च भागविण्यासाठी बाजारात मिळालेल्या कमी दरात शेतकºयांना कमी दरात मुग व उडिद विकावा लागला. अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात बहुतांश शेतकºयांनी बाजारात मूग व उडिद विकला असला तरी, हमी दराने या शेतमालाची खरेदी सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे हमी दराच्या खरेदीचे निकष केव्हा निश्चित करण्यात येणार याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

मुग, उडिद, सोयाबीनचे असे आहेत हमी दर !
शासनाने जाहीर केल्यानुसार मूग प्रतिक्विंटल ६ हजार ९७५ रुपये, उडीद प्रतिक्विंटल ५ हजार ६०० रुपये व सोयाबीन प्रतिक्विंटल ३ हजार ३९९ रुपये असे हमी दर आहेत; परंतू हमी दराच्या खरेदीचे निकष अद्याप शासनाकडून निश्चित करण्यात आले नसल्याने, बहुतांश शेतकºयांनी बाजारात कमी दरात मूग, उडिद विकला असल्याने, शेतकºयांना हमी दराचा लाभ मिळाला नाही.

 

Web Title: Mugh, Urad sold; But not get guaranteed rates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.