मुकीम अहमद व शेख शफी हत्या प्रकरण; पैशाचा पाऊस उठला दोघांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:33 PM2018-08-05T12:33:18+5:302018-08-05T12:38:55+5:30
अकोला - राज्यातील विविध घनदाट जंगलांमध्ये रात्रीला कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष व त्याच कारणावरून दोन मौलवींसह १३ जणांमध्ये निर्माण झालेलया अंतर्गत वादात आपचे नेते मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी या दोघांचे हत्याकांड घडल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
- सचिन राऊत
अकोला - राज्यातील विविध घनदाट जंगलांमध्ये रात्रीला कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष व त्याच कारणावरून दोन मौलवींसह १३ जणांमध्ये निर्माण झालेलया अंतर्गत वादात आपचे नेते मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी या दोघांचे हत्याकांड घडल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. अकोल्यातील आझाद कॉलनीमध्ये या दोघांची गळा आवळून हत्या झाल्यानंतर, त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील जंगलात लावण्यात आली.
आप नेते मुकीम अहमद हे पैशाचा पाऊ स पाडण्याचे आमिष देणाऱ्या काही मांत्रिकांच्या संपर्कात आले होते, तर अशाच प्रकारे दोन ते तीन गट कथितरित्या पैशाचा पाऊस पाडण्यासाठी रात्री-बेरात्री जंगलामध्ये फिरायचे. यासाठी त्यांच्यासोबत मांत्रिकही असायचे. गत अनेक वर्षांपासून त्यांचा हा खटाटोप सुरू होता. मात्र, प्रत्यक्षात यश येत नसल्याने तीनही गटात अंतर्गत कलह सुरू झाला. याच कलहात दोन मौलवी जे स्वत: मांत्रिक होते, त्यांचेही वाद सुरू झाले. या वादातच या गटातील सदस्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिस तक्रारी सुरू केल्या. कट रचून बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, यासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र या गटातील सहकाºयांनी एकमेकांच्या विरोधात रचले. तेलंगणातील अदिलाबाद, हिंगोली जिल्ह्यात व अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यात या गटातील सदस्यांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल आहेत. एकमेकांना फसविण्याची स्पर्धाच त्यांच्यात लागल्याने त्यांचे वाद विकोपाला गेले. या वादातच मुकीम अहमद व मौलवी शेख शफी शेख कादरी यांच्या हत्येचा कट रचल्या गेला. ३० जुलै रोजी रात्री आझाद कॉलनी येथील मौलवी तसब्बूर कादरी यांच्या निवासस्थानी मौलवी शेख शफी शेख कादरी व मुकीम अहमद या दोघांना बोलावण्यात आले. यांचे जेवण सुरू असतानाच मौलवी तसब्बूरने १३ आरोपींना दोघांचीही माहिती दिली. त्यानंतर संगनमताने या दोघांची गळा आवळून हत्या करण्यात आली. मध्यरात्री दोघांचेही मृतदेह पोत्यात बांधून कारने बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा परिसरातील जंगलात नेऊन खोल दरीत फेकण्यात आले, त्यावर दगडांचा खच टाकण्यात आला. मृतदेह नेण्यासाठी त्यांनी दोनदा तीन कार बदलल्या. संगनमताने कट रचून हे हत्याकांड घडविले. मात्र, अकोला पोलीस प्रशासन ताकदीने कामाला लागल्यानंतर, या प्रकरणाचा तीन दिवसांतच पर्दाफाश केला.