प्रोस्टेट आजाराच्या उपचारासंबंधित सल्लागार समितीत मुळावकर यांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:19 AM2021-07-27T04:19:56+5:302021-07-27T04:19:56+5:30

युरोलॉजीमधील विविध आजारांवर सुसूत्रतेने व्यवस्थित उपचार व्हावेत. या उद्देशाने युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने तीन वर्षांपूर्वी वेगवेगळ्या आजारांवरील तज्ज्ञांना त्यांच्या ...

Mulavkar's character in the advisory committee on the treatment of prostate disease | प्रोस्टेट आजाराच्या उपचारासंबंधित सल्लागार समितीत मुळावकर यांची वर्णी

प्रोस्टेट आजाराच्या उपचारासंबंधित सल्लागार समितीत मुळावकर यांची वर्णी

Next

युरोलॉजीमधील विविध आजारांवर सुसूत्रतेने व्यवस्थित उपचार व्हावेत. या उद्देशाने युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने तीन वर्षांपूर्वी वेगवेगळ्या आजारांवरील तज्ज्ञांना त्यांच्या कौशल्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील सल्लागार समितीवर निमंत्रित केले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली येथील माजी युरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. नर्मदा प्रसाद गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शिखर समितीची स्थापना केली. या शिखर समितीने डॉ. प्रशांत मुळावकर यांच्या योगदानाची दखल घेत, त्यांना प्रोस्टेट आजाराच्या उपचारासंबंधित राष्ट्रीय पातळीवरील सल्लागार समितीमध्ये निमंत्रित केले. राष्ट्रीय सल्लागार समितीत नडीयाद येथील डॉ. रवींद्र सबनीस समितीचे अध्यक्ष आहेत तर अहमदाबाद येथील डॉ. रोहित जोशी हे आहेत.

फोटो:

या समितीने प्रोस्टेट ग्रंथीच्या आजाराच्या संबंधित जगभरातील सर्व संशोधनाचा तुलनात्मक अभ्यास केला. त्याकरिता जवळपास ५०० हून अधिक प्रबंधांचा सविस्तर अभ्यास केला. प्रगत व अप्रगत देशातील प्रोस्टेट आजाराच्या उपचारासंबंधित शिफारसींवर विचार विनिमय केला गेला व २१६ शोध निबंधातील शिफारसी व निष्कर्ष स्वीकारण्यात आले.

शोध निबंधांची निवड करणे, त्यामधील निष्कर्षांचे मूल्यमापन करणे व अंतिम शिफारशींचा मसुदा तयार करणे ही महत्त्वाची कामे डॉ. प्रशांत मुळावकर यांनी केली. विविध आजाराबद्दल औषधे व ऑपरेशन यांची शिफारस केली. कोणती लक्षणे असल्यास कोणती औषधे द्यावीत, कोणती औषधे देऊ नयेत, कोणते ऑपरेशन करणे हितावह आहे याबद्दल चर्चा करून डॉ. मुळावकर यांनी जवळपास ५० पानांचा मसुदा तयार केला. शिखर परिषदेने त्यावर चर्चा करून तो जसाचा तसा स्वीकृत केला.

Web Title: Mulavkar's character in the advisory committee on the treatment of prostate disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.