मुंबई - हटिया आता आठवड्यातून दोन वेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 19:17 IST2021-06-15T19:17:34+5:302021-06-15T19:17:41+5:30
Mumbai - Hatia now twice a week : आता ही गाडी आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे.

मुंबई - हटिया आता आठवड्यातून दोन वेळा
अकोला : अनलॉक प्रक्रियेअंतर्गत प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेने मुंबई - हटिया या साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या वारंवारतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आता ही गाडी आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. यामुळे मुंबईला जाण्यासाठी अकोलेकरांना आणखी पर्याय उपलब्ध होणार आहेत.
गाडी क्रं ०२८११ ही विशेष गाडी २१ जून पासून दर रविवार व सोमवारी लोकमान्य टिळक टर्मीनन्स येथून सुटणार आहे. तर ०२८१२ ही विशेष गाडी १९ जून पासून दर शुक्रवार व शनिवारी सुटणार हटीया येथून मुंबई करीता रवाना होणार आहे. या विशेष गाड्यांचे थांबे व संरचना यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
साईनगर शिर्डी ते हावडा विशेष
०२५९३ विशेष अतिजलद साईनगर शिर्डी येथून १९ आणि २६ रोजी १४.१० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी हावडा येथे १९.३० वाजता पोहोचेल.
०२५९४ विशेष गाडी हावडा येथून दि. १७ आणि २४ जून रोजी १४.३५ वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसर्या दिवशी १९.१० वाजता पोहोचेल.