शुक्रवारपासून मुंबई-नागपूर दुरांतो, मुंबई-गोंदिया विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 05:55 PM2020-10-07T17:55:42+5:302020-10-08T19:08:30+5:30

Mumbai-Nagpur Duranto Express विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai-Nagpur Duranto, Mumbai-Gondia special trains from Friday | शुक्रवारपासून मुंबई-नागपूर दुरांतो, मुंबई-गोंदिया विशेष रेल्वेगाड्या

शुक्रवारपासून मुंबई-नागपूर दुरांतो, मुंबई-गोंदिया विशेष रेल्वेगाड्या

Next

अकोला : मिशन बिगीन अंतर्गत लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेनेमुंबई ते नागपूर दुरांतो व मुंबई ते गोंदिया एक्स्प्रेस या दोन विशेष रेल्वेगाड्यांसह पाच एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, ९ व १० ऑक्टोबरपासून या गाड्या सुरु होणार असून, या गाड्या पूर्णपणे आरक्षीत असून, ८ आॅक्टोबर पासून आरक्षण सुविधा उपलब्ध असणार आहे.
आगामी सणा-सुदीचे दिवस लक्षात घेता मध्य रेल्वेने नऊ आॅक्टोबरपासून पाच एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई ते नागपूर दुरांतो व मुंबई ते गोंदिया , डेक्कन क्वीन, इंद्रायणी आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
गाड़ी क्रमांक ०२१९० अप मुंबई ते नागपूर दुरंतो ही विशेष गाडी ९ आॅक्टोबर पासून नागपूर रेल्वेस्थानक येथून दररोज रात्री ८. २० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०५ वाजता मुंबई स्थानकावर पोहचेल. गाड़ी क्रमांक ०२१८९ डाउन मुंबई ते नागपुर दुरंतो ही विशेष गाडी १०आॅक्टोबर पासून मुंबई स्टेशन येथून दररोज रात्री ८.१५ वाजता रवाना होऊन दिवशी सकाळी ७.२० वाजता नागपूर स्थानकावर पोहचेल. या गाडीला फक्त भूसावळ येथे पाच मिनिटांचा थांबा असणार आहे.

गाड़ी क्रमांक ०२१०५ डाउन मुंबई - गोंदिया ही विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज सायंकाळी ७.०५ वाजता मुंबई स्थानकावरून रवाना होऊन दुसºया दिवशी सकाळी ११.२० वाजता गोंदिया स्थानकावर पोहचेल. ही गाडी दररोज पहाटे ४.१५ वाजता अकोला स्थानकावर येईल. गाड़ी क्रमांक ०२१०६ अप गोंदिया ते मुंबई ही विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज दुपारी ३ वाजता गोंदीया रेल्वेस्थानकावरून रवाना होऊन दुसºया दिवशी सकाळी ७ वाजता मुंबई स्थानकावर पोहचेल. ही गाडी दररोज रात्री ८.५५ वाजता अकोला स्थानकावर येईल.
या गाड्यांना नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मुर्तीजापूर,बडनेरा स्थानकावंर थांबा असणार आहे.

Web Title: Mumbai-Nagpur Duranto, Mumbai-Gondia special trains from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.