दिवाळी निमित्त मुंबई-नागपूर विशेष रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:55 AM2017-10-13T01:55:25+5:302017-10-13T01:55:46+5:30
दिवाळी निमित्ताने होणारी वाहतूक लक्षात घेत मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर या आठवड्यातील १५ आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे विदर्भातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दिवाळी निमित्ताने होणारी वाहतूक लक्षात घेत मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर मार्गावर या आठवड्यातील १५ आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे विदर्भातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे क्रमांक 0१0७५ (मुंबई-नागपूर) रविवार, १५ आणि २२ ऑक्टोबर रोजी मुंबईहून रात्री 00.२0 वाजता नागपूरकडे निघेल. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, मलकापूर, शेगाव होत ही गाडी अकोल्यात सकाळी ९ वाजता पोहोचणार आहे. बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा होत ही गाडी दुपारी १४ वाजता नागपूरला पोहोचणार आहे. परतीत रेल्वे क्रमांक्र 0१0७६ (नागपूर-मुंबई) गाडी सोमवार, १६ आणि २३ ऑक्टोबर रोजी १६ वाजून १५ मिनिटाला नागपूरहून निघेल. उपरोक्त स्थानकावर थांबा घेत ही रेल्वे रात्री २0.३५ वाजता अकोल्यात येईल. त्यानंतर मुंबईकडे रवाना होईल. सकाळी ८.१५ वाजता ही गाडी मुंबईत पोहोचणार आहे.
उधना-अलाहबाद विशेष सुपरफास्ट
मध्य रेल्वेच्यावतीने उधना-अलाहबाद आणि वडोदरा-अहमदाबाद विशेष रेल्वे आठवड्यात धावणार आहेत. या रेल्वेच्या प्रवासासाठी भुसावळहून गाडी पकडावी लागेल. रेल्वे क्रमांक 0९0३९ ही गाडी १२ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान आठवड्यातील दर गुरुवारी धावणार आहे.
वडोदरा-अलाहबाद विशेष सुपरफास्ट
अलाहबादहून वडोदरादरम्यान साप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ट्रेन क्रमांक 0९१0३ क्रमांकाची (वडोदरा-अलाहबाद) रेल्वे १५ ऑक्टोबर ते ५ नोंव्हेबरपर्यंत चालविली जाणार आहे.