मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसने भुसावळ जंक्शनला केले बायपास; प्रवाशांच्या पदरी निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:19 PM2019-01-19T18:19:13+5:302019-01-19T18:19:55+5:30
अकोला : मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग थेट जळगावहून पुढे असल्याने भुसावळच्या लोकांनादेखील या गाडीची सेवा मिळणार नाही. भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार नसल्याने अनेक प्रवाशांच्या पदरी निराशा आली आहे.
अकोला : मुंबई-दिल्ली मार्गावर शनिवारपासून नव्याने सुरू झालेल्या मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांची घोर निराशा केली आहे. प्रत्येक आठवड्यातील शनिवार आणि बुधवारी दोन दिवस धावणाऱ्या मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग थेट जळगावहून पुढे असल्याने भुसावळच्या लोकांनादेखील या गाडीची सेवा मिळणार नाही. भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार नसल्याने अनेक प्रवाशांच्या पदरी निराशा आली आहे.
शनिवार, १९ जानेवारीपासून मुंबई-निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाडी सुरू झाली. दिल्लीकडे धावणारी एक रेल्वे मिळत असल्याचा आनंद भुसावळ विभागातील अकोल्यापर्यंत होता; मात्र जेव्हा या रेल्वेगाडीचे वेळापत्रक आले, तेव्हा स्पष्ट झाले, की ही गाडी जळगावहून पुढे वळणार आहे. भुसावळलादेखील या गाडीला प्रवेश नसल्याने प्रवाशांची घोर निराशा झाली आहे. राजधानीने भुसावळ जंक्शन रेल्वे स्टेशनलाच बायपास केल्याने प्रवाशांनी टीका सुरू केली आहे. २२२२१ क्रमांकाची डाउन मार्गे धावणारी मुंबई-हजरत निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस १९ जानेवारी दुपारी २.५० वाजता निघाली. आठवड्यातील प्रत्येक बुधवार आणि शनिवारी ती धावणार आहे. या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, बिना, झाशी, आग्रा कॅन्ट, पळवल या स्टेशनवर थांबा असेल. नव्याने सुरू झालेल्या या राजधानी एक्स्प्रेसला किमान भुसावळ मार्गे तरी वळविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.