औषध दुकानांची मुंबईतील अधिकाऱ्यांकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:54 AM2020-01-15T10:54:14+5:302020-01-15T10:54:19+5:30
नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई येथील दोन अधिकाºयांनी अकोल्यातील औषध दुकानांची मंगळवारी तपासणी केली.
अकोला : अकोला अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकाऱ्यांची रिक्त पदे तसेच जिल्ह्यातील औषध व्यावसायिकांचा वाढलेला बेताल कारभार जागेवर आणण्यासाठी शहरातील औषध दुकानांची मुंबईतील दोन अधिकाºयांच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. यामधील एक अधिकारी आणखी काही दिवस तपासणी करणार असल्याची माहिती आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागात सध्या सहआयुक्ताचा प्रभार हेमंत मेतकर यांच्याकडे आहे; मात्र त्यांच्या व्यतिरिक्त अधिकारी व कर्मचारी या कार्यालयात नसल्याने औषध दुकानांची तपासणी थांबलेली आहे. अशातच अकोल्यातील औषध दुकानांचा कारभार पुरता ढेपाळला असून, विनादेयकामध्ये विक्री करणे, तसेच बड्या मेडिकल संचालकांचे परवाने नसतानाही दुकान खुलेआम सुरू असणे यासारखे प्रकार प्रचंड वाढले आहेत.
त्यामुळे या सर्व प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई येथील दोन अधिकाºयांनी अकोल्यातील औषध दुकानांची मंगळवारी तपासणी केली. ही तपासणी सुरूच राहणार असून, आणखी काही औषध दुकानांचे परवाने तसेच देयक तपासण्यात येणार असल्याची माहिती आहे. अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील औषध दुकानदारांना अधिकारी व कर्मचारी नसणे हे चांगलेच पथ्यावर पडत असल्याची माहिती आहे.