अकोल्यातील वृद्धाची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील प्राध्यापकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:20 PM2019-12-10T18:20:57+5:302019-12-10T18:21:04+5:30
पाटील याने अय्यंगार यांच्यासोबत मैत्री केली तसेच खासगी संस्था चालवीत असल्याचे सांगून गुंतवणुक केल्यास दर महिन्याला चांगली परतफेड मिळण्याचे आमीष दाखवीले.
अकोला - रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अय्यंगार नामक एका वृध्दाची १० लाख रुपयांनी फसवणुक करणाºया मुंबईतील एका प्राध्यापकास रामदास पेठ पोलिसांनी सोमवारी मुंबइतील डोंबीवली येथून अटक केली. राजेंद्र पाटील नामक या प्राध््यापकास मंगळवारी अकोल्यात आणल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका आश्रमात नारायण अय्यंगार वास्तव्यास आहेत. त्यांना एका अध्यात्मीक कार्यक्रमात मुळचा भुसावळ येथील रहिवासी तसेच सद्या मुंबईत प्राध्यापक असलेला राजेंद्र नथ्थु पाटील याची भेट झाली. पाटील याने अय्यंगार यांच्यासोबत मैत्री केली तसेच खासगी संस्था चालवीत असल्याचे सांगून गुंतवणुक केल्यास दर महिन्याला चांगली परतफेड मिळण्याचे आमीष दाखवीले. याच आमीषाला बळी पडत अय्यगांर यांनी पाच लाख रुपयांची रोकड एका बँकेव्दारे राजेंद्र पाटील यांना दिली. त्यानंतर आणखी पाच लाख रुपयांची रक्कम राजेंद्र पाटील याचे आई वडीलांच्या जवळ रोख दिली. त्याचे आई-वडील भुसावळ येथे राहत असून त्यांच्या निवासस्थानी ही रक्कम त्यांनी दिली. त्यानंतर राजेंद्र पाटील यांना १० लाख रुपयांची रक्कम जमा ठेव ठेउन त्या रकमेवर मोबदल्यात दर महिन्याला रक्कम देणे सुरु केले. तीन ते चार महिने त्यांनी ही रक्कम दिली. मात्र त्यानंतर महिन्याला देय असलेली रक्कम देणे राजेंद्र पाटील याने देणे बंद केले. त्यामुळे अय्यगांर यांनी त्यांची जमा ठेव असलेली १० लाख रुपयांची रक्कम मागणे सुरु केले. मात्र पाटील याने त्यांची टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे अय्यगांर यांना त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रामदास पेठ पोलिस स्टेशन गाठून या प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून राजेंद्र नथ्थु पाटील, नथ्थु पाटील व त्याच्या आईविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० तसेच४०६ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर राजेंद्र पाटील याचा शोध घेण्यात येत असतांनाच तो मुंबईतील डोंबीवली परिसरातील एका महाविद्यालयात प्राध््यापक असल्याचे समोर आले. यावरुन रामदास पेठचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाम पीएसआय संदीप मडावी यांनी पथकासह मुंबईत दाखल होउन प्राध्यापकास अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीस १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास संदीप मडावी करीत आहेत.