मुंडगाव येथील विद्यार्थिनीचा ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात डंका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:12+5:302021-05-06T04:19:12+5:30
मुंडगाव : अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील सधन शेतकरी रामदास मोतीराम थारकर यांची मुलगी प्रियंका थारकर (सदार) हिने वयाच्या ३५ ...
मुंडगाव : अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील सधन शेतकरी रामदास मोतीराम थारकर यांची मुलगी प्रियंका थारकर (सदार) हिने वयाच्या ३५ व्या वर्षी कॅन्सर रोगावर संशोधन करून प्रबंध सादर केला. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील विद्यापीठाने तिला डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मान केला. शेतकऱ्याच्या मुलीने विदेशातील विद्यापीठात संशोधन सादर करून देशाचे नाव उंचावले आहे.
मुंडगाव येथील सधन शेतकरी रामदास मोतीराम थारकर याची मुलगी प्रियंका थारकर (सदार) हिचे शिक्षण एम. फार्मपर्यंत झाल्यावर तिने अकोला येथे काॅलेजवर प्राध्यापिका म्हणून काम केले व त्यानंतर लग्न होऊन काही दिवसांनी ती न्यूझीलंड येथे गेल्यावर २०१२ मध्ये इनिव्हर सिटी ऑफ ऑकलंड न्यूझीलंड येथे संशोधनास सुरुवात केली. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी येथे पीएचडी करून तेथे ऑस्ट्रेलिया सरकारकडून तिला स्कूल ऑफ फार्मसीची स्काॅलरशिप मिळाली व इंटरनॅशनल काॅन्फरन्समध्ये इनव्हायटेड गेस्ट स्पीकर म्हणून सिडनी येथे त्यांना पाचारण करण्यात आले. नॅनो इन्स्टिट्यूट यांच्याकडून टाॅपअप स्काॅलरशिप मिळवून त्यांनी सायंटिफिक रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत. प्रियंका थारकर हिचा विषय कॅन्सर संबंधित असून, विशेष म्हणजे प्रियंकाने यावर संशोधन करून कॅन्सरमध्ये हेल्दी पेशी कशा प्रकारे वाचविता येतील यावर संशोधन केले व सूक्ष्म औषधी नॅनो ऑप्टिक्लस हे औषध बनविले. यासाठी प्रियंकाला ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी नुकतीच बहाल करण्यात आली. प्रियंकाला अमरावती येथील सासरे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दादासाहेब सदार, शिकागो अमेरिका येथे एमएस झालेले पती प्रियन सदार व मुलगी रिया यांचे सहकार्य मिळाले.
फोटो :