मनपा सफाई कर्मचा-यांची उचलबांगडी होणार!

By admin | Published: September 16, 2016 03:09 AM2016-09-16T03:09:40+5:302016-09-16T03:09:40+5:30

आयुक्त अजय लहाने यांचा इशारा.

Municipal cleaners will be caught off guard! | मनपा सफाई कर्मचा-यांची उचलबांगडी होणार!

मनपा सफाई कर्मचा-यांची उचलबांगडी होणार!

Next

अकोला, दि. १५- पडीत प्रभागांसह प्रशासकीय प्रभागांमधील साफसफाईच्या कामांचा बोजवारा उडाल्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी पडीत प्रभागातील कंत्राटदारांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला असून चपराशी पदाच्या आड दडून बसलेल्या सफाई कर्मचार्‍यांची उचलबांगडी करण्याचा इशारा दिला आहे. शहरात साफसफाईच्या कामांसाठी मनपाच्या आस्थापनेवर ७४८ कर्मचार्‍यांसह पडीत प्रभागाच्या नावाखाली २५२ पेक्षा जास्त खासगी सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पडीत ३६ वार्डांमध्ये (१८ प्रभाग) खासगी कंत्राटदारांकडूनही नित्यनेमाने साफसफाईची कामे होणे गरजेचे आहे. यातील बहुतांश प्रभागातील साफसफाईच्या कामांचा कंत्राट नगरसेवकांच्या नातेवाइकांनी किंवा कार्यकर्त्यांनी मिळवला असल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती आहे. कमीत कमी सफाई कर्मचार्‍यांच्या माध्यमातून प्रभागात गरज असेल त्या ठिकाणी साफसफाईची कामे करून घेण्याकडे संबंधित नगरसेवक व कंत्राटदारांचा कल दिसून येतो. परिणामी प्रभागांमध्ये अस्वच्छतेने कळस गाठल्याचे चित्र आहे. हाच प्रकार प्रशासकीय प्रभागांमध्ये असून या ठिकाणी आस्थापनेवरील सफाई कर्मचारी साफसफाईची कामे नित्यनेमाने करण्याचा दावा करतात. शहराच्या कानाकोपर्‍यात साचलेली घाण, कचरा-घाणीने गच्च भरलेल्या सर्व्हिस लाइन, रस्त्यावर साचलेला प्लास्टिक पिशव्यांचा कचरा, दुभाजकांमध्ये साचलेली माती पाहता पालिकेचे सफाई कर्मचारी किती प्रामाणिकपणे काम करतात, हे दिसून येते. अर्थातच, महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे नियोजन, कामकाजावरील देखरेख पाहता संबंधित विभागाकडूनच अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. हा प्रकार कमी म्हणून की काय, आस्थापनेवरील ७४८ कर्मचार्‍यांमधील अनेक कर्मचारी ३६ प्रभागांमध्ये चपराशी पदाच्या आड दडून बसले आहेत. प्रभागातील साफसफाईच्या कामांवर देखरेखीसाठी आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती असताना चपराशी पदावरील कर्मचारी नेमकी कोणती कर्तव्य बजावतो, असा सवाल उपस्थित झाला. यासंदर्भातील वृत्ताची दखल घेत आयुक्त अजय लहाने यांनी साफसफाईच्या कामाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला असून चपराशी पदावरील सफाई कर्मचार्‍यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला आहे. हजेरी घेणारे संशयाच्या भोवर्‍यात साफसफाई करणार्‍या कर्मचार्‍यांची दररोज हजेरी घेतली जाते. ही केवळ औपचारिक प्रक्रिया असून सकाळी सात वाजता हजेरीवर स्वाक्षरी किंवा अंगठा लावल्यानंतर सकाळी ११ नंतर शहरात कोठेही सफाई कर्मचारी साफसफाई करताना आढळून येत नसल्याची बाब प्रशासनाच्या तपासणीत समोर आली आहे. त्यामुळे हजेरी घेणारे मनपाचे कर्मचारी संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

Web Title: Municipal cleaners will be caught off guard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.