पडीक वाॅर्ड बंद हाेण्याच्या धास्तीने मनपा आयुक्तांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:19 AM2021-04-23T04:19:57+5:302021-04-23T04:19:57+5:30
एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई नाही! पडीक वाॅर्ड बंद केल्यास आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ताेकडी पडण्याची शक्यता नगरसेवक व्यक्त करीत आहेत. ...
एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई नाही!
पडीक वाॅर्ड बंद केल्यास आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ताेकडी पडण्याची शक्यता नगरसेवक व्यक्त करीत आहेत. अनेक सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर न हाेता परस्पर हजेरी पुस्तिकेवर स्वाक्षरी करतात, असे अनेक आक्षेप व्यक्त केले जात असले तरी आजवर काेणत्याही आराेग्य निरीक्षकाने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एकाही सफाई कर्मचाऱ्यावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही, हे येथे उल्लेखनीय.
‘एसआय’च्या कामाकडे दुर्लक्ष का?
स्वच्छतेच्या कामासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, हजेरी पुस्तिका तपासणे, कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने आराेग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शहरात नजरेस पडणारी अस्वच्छता, धुळीने माखलेले रस्ते, घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या, गटारांसाठी आराेग्य निरीक्षकांवरही कारवाई व्हावी, असा सूर प्रामाणिक कर्मचाऱ्यांमधून उमटू लागला आहे.