महापालिका आयुक्तांनी घेतली विविध विभागांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:57 PM2019-01-02T12:57:34+5:302019-01-02T12:57:38+5:30
अकोला : महापालिका कर्मचाºयांना शिस्त लावण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी विविध विभागांची झाडाझडती घेतली. त्यावेळी दहा कर्मचारी गैरहजर आढळून आले आहेत.
अकोला : महापालिका कर्मचाºयांना शिस्त लावण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी विविध विभागांची झाडाझडती घेतली. त्यावेळी दहा कर्मचारी गैरहजर आढळून आले आहेत. त्यांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ हे रजेवर गेल्यापासून महापालिकेची शिस्त बिघडली होती. कर्मचारी बेफिकीर झाले होते. मनपा आयुक्त म्हणून रुजू झाल्यावर संजय कापडणीस यांनी सर्वात आधी शिस्तीवर भर दिला आहे. त्यांनी महापालिकेच्या विविध विभागांची झाडाझडती घेतली. यामध्ये दहा कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळले. त्यामध्ये सुनील नकवाल, आरोग्य स्वच्छता विभाग, अशोक जाधव, शिपाई कर विभाग, मुकुंद गणोजे, उपभियंता जलप्रदाय, दिनेश गोपनारायण, कनिष्ठ अभियंता जलप्रदाय विभाग, रवींद्र शिरसाट, अभिलेखा, राजेश दांदळे माहिती अधिकार कक्ष, चंचल ढोणे शिपाई आवक-जावक, निर्मला डोंगरे लिपिक संगणक, रफीक अहमदखान स्वीय सहायक रोखपाल विभाग, दीपा गोठवाल माहिती अधिकार कक्ष या कर्मचाºयांचा समावेश आहे. या सर्वांचा एक दिवसाचा पगार कापण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान, आयुक्तांनी जलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग अथवा इतर विभागांच्या फाइलवर तसेच टिप्पणीवर स्वाक्षरी करणाºया प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी स्वाक्षरी करून त्याखाली स्वत:चे नाव, तारीख व आपल्या पदनामाचा उल्लेख करणे अनिवार्य आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे.
विभाग प्रमुखांना दिले अधिकार!
प्रशासकीय कामकाज अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालावे, यासाठी आयुक्तांनी नागरिकांची तथा नगरसेवकांची कामे तातडीने त्यांच्याच स्तरावर निकाली काढण्याचे अधिकार विभाग प्रमुखांना देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना महापालिकेत आल्यानंतर कामासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ नको, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रशासकीय एक भाग म्हणून उपायुक्त सुमत मोरे यांनी काही महत्त्वपूर्ण अधिकार आयुक्तांनी बहाल केले आहेत.
महापालिका प्रशासनाला शिस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कामासाठी महापालिकेत धाव घ्यायची अन् अधिकारी कर्मचाºयांनी दांडी मारायची, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशाप्रमाणे झाडाझडती नियमित घेतली जाणार आहे. आज वेतन कपातीचे निर्देश दिले आहेत, यानंतर असाच प्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- संजय कापडणीस, आयुक्त महापालिका.