मनपा आयुक्तांनी घेतली जलप्रदाय विभागाची झाडाझडती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:34 PM2019-02-02T12:34:38+5:302019-02-02T12:34:46+5:30
अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस प्रशासकीय कामकाज ताळ्यावर आणण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मनपा आयुक्तांनी विविध विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली.
अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस प्रशासकीय कामकाज ताळ्यावर आणण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मनपा आयुक्तांनी विविध विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली. त्यानंतर दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजतापर्यंत जलप्रदाय विभागातील कामकाजाची झाडाझडती घेतली. त्यावेळी त्यांनी जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी कार्यादेश जारी के ले.
महापालिकेत प्रामाणिक कर्तव्य बजावणाºया कर्मचाºयांची मोठी संख्या असली, तरी काही कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाºयांमुळे प्रामाणिक कर्मचाºयांच्या हेतूवरही नाहक प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जातात. याचा परिणाम मनपाच्या प्रशासकीय कारभारावर होत असल्याचे चित्र आहे. कार्यालयीन वेळेचे भान न ठेवता कार्यालयात उशिरा येणे, दुपारी २ वाजतानंतर कामाला दांडी मारून थेट ६ वाजता मनपात दाखल होणाºया कर्मचाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. कामचुकार कंत्राटी कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर आयुक्तांनी मानसेवी कर्मचाºयांच्या बदल्यांचा निर्णय घेतला. ५२ कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात केल्यानंतर शुक्रवारी आयुक्त कापडणीस यांनी पुन्हा एकदा विविध कार्यालयांचा फेरफटका मारला.
जलप्रदाय विभागाचा आढावा
जलप्रदाय विभागामार्फत जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करणाºया काही कंत्राटदारांच्या संदर्भात आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी दुपारी आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागात जाऊन साचून पडलेल्या फायलींची माहिती घेतली, तसेच विविध कामे निकाली काढण्याचे निर्देश दिले.
बोगस देयकांवर करडी नजर
जलप्रदाय विभागामार्फत कामे करणाºया कंत्राटदारांचे कारनामे आयुक्तांपर्यंत पोहोचले आहेत. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली या विभागाची आर्थिक लूट करणाºया कंत्राटदारांच्या देयकांवर आयुक्तांची करडी नजर राहणार असल्याचे संकेत आहेत.