मनपा आयुक्त वाघ यांना महसूल विभागात परतण्याचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 01:08 PM2018-12-05T13:08:28+5:302018-12-05T13:08:38+5:30
अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची नियुक्ती महसूल विभागात आहे. त्यांची महापालिका आयुक्त पदी असलेली प्रतिनियुक्ती नोव्हेंबर मध्येच संपली असून त्यांना आता मुळ विभागा परतण्याचे वेध लागले असल्याची माहिती आहे.
अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची नियुक्ती महसूल विभागात आहे. त्यांची महापालिका आयुक्त पदी असलेली प्रतिनियुक्ती नोव्हेंबर मध्येच संपली असून त्यांना आता मुळ विभागा परतण्याचे वेध लागले असल्याची माहिती आहे. सध्या ते आजारी रजेवर गेले आहेत. अकोला महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर महसूल विभागातील जितेंद्र वाघ यांना अकोला मनपाचे आयुक्त म्हणून पाठविण्यात आले होते. १० नोव्हेंबर १७ रोजी त्यांना ही प्रतिनियुक्ती देण्यात आली. एका वर्षासाठी ही प्रतिनियुक्ती असल्याचे आदेशात नमूद होते. हे आदेश संपुष्टात येण्याआधीपासूनच आयुक्त वाघ यांना महसूल विभागाचे वेध लागले. त्यामुळे त्यांनी अकोल्यात पुन्हा रुजू होण्याचे टाळले असल्याची चर्चा आहे. १० नोव्हेंबर २०१८ रोजी प्रतिनियुक्तीच्या आदेशाला एक वर्ष पूर्ण झाल्याने ते पुन्हा अकोल्यात येण्याच्या मन:स्थितीत नाही. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
सुरेश हुंगेंचाही कार्यकाळ संपुष्टात
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचे अभियंता सुरेश हुंगे अकोला महापालिकेतील पाणी पुरवठा विभागात काही महिन्यांसाठी प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळही मागेच संपुष्टात आला. दरम्यान, मजीप्राने त्यांची बदली यवतमाळ येथे केली आहे; मात्र अमृत योजनेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प त्यांनी हाती घेतल्याने ते त्यांच्या विभागात परत गेलेले नाही. पदाधिकाऱ्यांनीदेखील त्यांना थांबवून ठेवले आहे.