महापालिकेला कामचुकार कर्मचाऱ्यांची गरज नाही - मनपा आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:12 PM2019-01-29T13:12:23+5:302019-01-29T13:12:29+5:30
अकोला: मनपाचा प्रशासकीय डोलारा विस्कळीत असताना सर्वांनी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल तर महापालिकेला अशा कामचुकार कर्मचाºयांची गरज नसल्याचे सांगत सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन कंत्राटी कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविला.
अकोला: मनपाचा प्रशासकीय डोलारा विस्कळीत असताना सर्वांनी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल तर महापालिकेला अशा कामचुकार कर्मचाºयांची गरज नसल्याचे सांगत सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन कंत्राटी कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविला, तसेच अशा कामचुकार, निष्क्रिय कर्मचाºयांचा शोध घेऊन त्यांची यादी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी आढावा बैठकीत विभाग प्रमुखांना दिले. आयुक्तांच्या रोखठोक भूमिकेमुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासकीय कामकाजाला प्राधान्य देणार असल्याचे सांगत कामचुकार कर्मचाºयांची हयगय करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याची चुणूक मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. प्रशासकीय कामकाजात हलगर्जी व कर्तव्यापासून पळ काढणाºया कंत्राटी कर्मचाºयांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आल्याचे चित्र आहे. यासोबतच बांधकाम विभाग, नगररचना विभाग, अतिक्रमण विभागात एकसूत्री कारभारासाठी कर्मचाºयांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. सोमवारी मनपात दाखल झालेल्या आयुक्त संजय कापडणीस यांनी सकाळी १०.३० वाजता विविध विभागात जाऊन कर्मचाºयांची हजेरी घेतली. त्यावेळी तपासणीदरम्यान ५२ कर्मचारी कर्तव्यावर अनुपस्थित आढळून आले. संबंधित कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
तीन क र्मचाºयांची सेवा बंद
मनपाच्या नगररचना विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत दोन कनिष्ठ अभियंता व एक कंत्राटी आरोग्य निरीक्षक यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला. तसे निर्देश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले.
...तर अशा कर्मचाºयांचा शोध घ्या!
शहर आपले आहे, या भावनेतून मनपात सेवा बजावा, सेवा देण्याच्या बदल्यात तुम्हाला महापालिका वेतन अदा करते, याचे भान ठेवा, जे कर्मचारी कर्तव्यापासून पळ काढतील, अशा कामचुकार व निष्क्रिय कर्मचाºयांचा शोध घेऊन त्यांची यादी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करा, अशा कर्मचाºयांची मनपाला गरज नसल्याचा खणखणीत इशारा आयुक्त संजय कापडणीस यांनी विभाग प्रमुखांना दिला.
शासनाचे अधिकारी वगळल्यास मनपा कर्मचाºयांचे वेतन अकोलेकरांकडून प्राप्त कर स्वरूपातील रकमेतून होते, याचे भान कर्मचाºयांची ठेवण्याची गरज आहे. प्रामाणिकपणे सेवा देण्याची तयारी नसेल, तर कर्मचाºयांनी घराचा मार्ग पत्करावा, यापुढेसुद्धा कर्तव्यात कसूर करणाºयांची हकालपट्टी सुरूच राहील.
-संजय कापडणीस आयुक्त मनपा