महापालिकेचा घनकचऱ्याच्या विलगीकरणाला खाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:44+5:302020-12-23T04:15:44+5:30

अकाेला : शहरात जमा हाेणाऱ्या घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर हाेत चालली असून, त्यावर उपाय शाेधून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र ...

Municipal Corporation eats solid waste segregation! | महापालिकेचा घनकचऱ्याच्या विलगीकरणाला खाे!

महापालिकेचा घनकचऱ्याच्या विलगीकरणाला खाे!

googlenewsNext

अकाेला : शहरात जमा हाेणाऱ्या घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर हाेत चालली असून, त्यावर उपाय शाेधून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून काेट्यवधींचा निधी वितरित केला जात आहे. मनपा प्रशासनाने माेठा गाजावाजा करीत कचरा जमा करण्यासाठी १२५ वाहनांची खरेदी केली. या वाहनांमध्ये कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्याची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना विलगीकरणाच्या प्रक्रियेला महापालिकेने खाे दिल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.

शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजीबाजार व घरांमधून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१५ मध्ये १२५ चारचाकी वाहनांची खरेदी केली हाेती. या वाहनांत कचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी व्यवस्था उभारण्यात आली आहे. घरातील शिळे अन्न, पालेभाज्या आदी ओला कचरा व घरातील धूळ, माती, निरुपयाेगी कागद अशा सुका कचऱ्याच्या विलगीकरणासाठी नागरिकांनी घरी पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन मनपाकडून सातत्याने करण्यात येते. अर्थात, मनपाच्या वाहनात तशी व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे साहजिकच कचरा जमा करणाऱ्या वाहनचालकाने वाहनात ओला व सुका कचऱ्याची साठवणूक करून वाहतूक करणे अपेक्षित आहे. एकीकडे मनपास्तरावर ‘स्वच्छ सर्वेक्षण’चा गवगवा केला जात असतानाच दुसरीकडे प्रशासनाकडून घनकचऱ्याची याेग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्याचे चित्र समाेर आले आहे. कचरा जमा करणाऱ्या वाहनांमध्ये ओला व सुका कचरा एकत्र जमा करून ताे नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर उघड्यावर फेकून देण्यात प्रशासन धन्यता मानत आहे.

स्वच्छतादूत ढिम्म; नागरीकही बेफिकीर

मनपाने कंत्राटी तत्त्वावर १२५ वाहनचालकांची नियुक्ती केली. त्यांना ‘स्वच्छतादूत’ म्हणून ओळखले जात असले तरी घराेघरी किंवा बाजारातून कचरा जमा करताना मनपाचे स्वच्छतादूत वाहनात ढिम्म बसल्याचे दिसून येतात. वाहनात ओला व सुका कचरा वेगळा टाकावा, याबाबत अकाेलेकरही बेफिकीर आढळून आले.

नायगाववासीयांना ग्रासले आजारांनी

मागील अनेक वर्षांपासून शहरातील घनकचऱ्याची नायगाव येथील कचरा संकलन केंद्रावर साठवणूक केली जात आहे. या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर काेणतीही प्रक्रिया केली जात नसल्यामुळे दुर्गधीमुळे स्थानिक रहिवाशांना विविध आजारांनी ग्रासल्याची स्थिती आहे.

....फाेटाे,टाेलेजी....फाेल्डर २२ डिसेंबर....

() ; ! ? -

Web Title: Municipal Corporation eats solid waste segregation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.