महापालिकेला लागले पाण्याच्या काटकसरीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:08 AM2017-08-23T01:08:26+5:302017-08-23T01:09:05+5:30

अकोला: काटेपूर्णा प्रकल्पात अत्यल्प जलसाठा असल्याने  भविष्यात पाणीटंचाईची समस्या बिकट होऊ नये यासाठी, महा पालिकेला आता पिण्याच्या पाण्याच्या काटकसरीचे वेध लागले  आहेत. दरम्यान, महापौर विजय अग्रवाल आणि उपमहापौर  वैशाली शेळके यांनी जलप्रदाय विभागाची आढावा बैठक घेऊन  काटकसरीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात.

Municipal corporation started harassment | महापालिकेला लागले पाण्याच्या काटकसरीचे वेध

महापालिकेला लागले पाण्याच्या काटकसरीचे वेध

Next
ठळक मुद्देमहापौर, उपमहापौरांनी घेतली जलप्रदायची आढावा बैठकमहापौरांची बोलण्यात अन् वागण्यात विसंगती

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: काटेपूर्णा प्रकल्पात अत्यल्प जलसाठा असल्याने  भविष्यात पाणीटंचाईची समस्या बिकट होऊ नये यासाठी, महा पालिकेला आता पिण्याच्या पाण्याच्या काटकसरीचे वेध लागले  आहेत. दरम्यान, महापौर विजय अग्रवाल आणि उपमहापौर  वैशाली शेळके यांनी जलप्रदाय विभागाची आढावा बैठक घेऊन  काटकसरीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात.
यंदा संपूर्ण विदर्भातच पाऊस कमी असल्याने अनेक प्रकल्पांमध्ये  जलसाठा अत्यल्प आहे. अकोला शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून  पाणीपुरवठा केला जातो. सध्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये १६.४१ ट क्के एवढा साठा आहे. त्यामुळे आतापासूनच काटकसरीने  पाण्याचा वापर केला तरच भविष्यात पाणी समस्येला तोंड देणे श क्य आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसर करावी, असे आवाहन  महापौर विजय अग्रवाल यांनी केले आहे. कार्यकारी अभियंता  यांच्या दालनात पाणी पुरवठय़ाबाबत आढावा बैठक घेतली.  शहरातील सर्व सबर्मसिबल पंपांना व हातपंपांना नंबरिंग करून कि  ती पंप नादुरुस्त आहेत, याची नोंद सादर करण्याचे सांगितले.  शहरातील कोणत्या भागात पाणी पोहोचत नाही आणि किती  नळजोडणीवर आतापर्यंत मीटर लागले, याची माहिती देण्याचेही  येथे सुचविले गेले. तसेच शहरातील सर्वप्रथम स्लम भागातील सर्व  सबर्मसिबल व हातपंपांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार  असल्याचेही येथे सांगितले गेले.

Web Title: Municipal corporation started harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.