मनपा राबविणार शाळाबाह्य बालकांची शाेध माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:19 AM2021-03-05T04:19:13+5:302021-03-05T04:19:13+5:30

महापालिका क्षेत्रात स्थलांतरीत व शाळाबाह्य मुलांचा शाेध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी मनपाच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाेध माेहीम ...

Municipal Corporation will run a search campaign for out-of-school children | मनपा राबविणार शाळाबाह्य बालकांची शाेध माेहीम

मनपा राबविणार शाळाबाह्य बालकांची शाेध माेहीम

Next

महापालिका क्षेत्रात स्थलांतरीत व शाळाबाह्य मुलांचा शाेध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी मनपाच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाेध माेहीम राबवली जाते. यामुळे पटसंख्या वाढीला मदत हाेते. शहरात काेराेनाच्या प्रादूर्भावाला आळा घालण्यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. यामध्ये प्रामख्याने शिक्षकांचा समावेश आहे. अशास्थितीतही स्थलांतरित मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत,याची दक्षता घेत प्रभारी आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांनी शाेध माेहीम राबविण्याच्या अनुषंगाने सभेचे आयाेजन केले हाेते. ही माेहीम ५ मार्च ते १५ मार्च या कालावधीत राबवली जाणार आहे. सभेमध्ये उपजिल्‍हाधिकारी विश्‍वनाथ घुगे, जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍थेचे प्राचार्य समाधान डुकरे, मनपाचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, राजेंद्र टापरे, देविदास निकाळजे, जिल्‍हा समन्‍वयक आरती जाधव, महिला व बाल कल्‍याण अधिकारी संगीता ठाकुर, स्‍वयंसेवी संस्‍थेचे प्रतिनिधी, बालरक्षक, सदस्‍य सचिव म्‍हणून मनपा शिक्षणाधिकारी डॉ.शाहीन सुलताना, जिल्‍हा समन्‍वयक, शाळा निरीक्षक मो.अनवर यांचा समावेष होता.

Web Title: Municipal Corporation will run a search campaign for out-of-school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.