नगर परिषद निवडणुका लोकांना सोबत घेऊन लढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:59+5:302021-08-29T04:20:59+5:30

‘प्रहार’चे संस्थापक राज्यमंत्री बच्चू कडू यांचे सूतोवाच विजय शिंदे अकोट : आगामी नगर परिषद, महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रहार ...

Municipal council elections to be fought with people! | नगर परिषद निवडणुका लोकांना सोबत घेऊन लढणार!

नगर परिषद निवडणुका लोकांना सोबत घेऊन लढणार!

Next

‘प्रहार’चे संस्थापक राज्यमंत्री बच्चू कडू यांचे सूतोवाच

विजय शिंदे

अकोट : आगामी नगर परिषद, महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष लोकांना सोबत घेऊन लढू, असे सूतोवाच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

नगर परिषद, महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षात हलचल सुरू झाली असून, इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचत आहे. राज्य निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभाग रचनेला पूर्णविराम देत बुधवारी एक प्रभाग एक सदस्य (वाॅर्ड)रचना करीत कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. राजकीय पक्षाची रणनीती ठरविली जात असल्याचे चित्र आहे. सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडीची सत्ता असून, प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी आहे. प्रहारचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू हे सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. त्या अनुषंगाने नगर परिषद निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका कशी राहील, याबाबत अकोट येथे पालकमंत्री बच्चू कडू यांना विचारणा केली असता, त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष नगर परिषद निवडणूक लोकांना सोबत घेऊन लढवेल, असे सूतोवाच केले. सध्या नगर परिषद व महापालिका निवडणूक महाआघाडीसोबत एकत्र लढायचे की, स्वतंत्रपणे याबाबत विचारमंथन पक्षीय बलाबलाची गोळाबेरीज सुरु आहे. आगामी निवडणुकीत एक वॉर्ड-एक सदस्य रचना होत असल्याने कार्यकर्ते उत्साह संचारला आहे. दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नगर परिषद निवडणूक लोकांना सोबत घेऊन लढणार असल्याचे गुगली टाकल्याने भविष्यात प्रहार जनशक्ती पक्षाची रणनीती पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, जि.प सदस्य गजानन पुंडकर, प्रहारचे पदाधिकारी सुशील पुंडकर, निखिल गावंडे, कुलदीप वसू, प्रहार सरपंच राम मंगळे, विशाल भगत यांच्यासह प्रहार सेवक उपस्थित होते.

Web Title: Municipal council elections to be fought with people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.