मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू; हद्दवाढ क्षेत्रातील कामकाज प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:52 PM2020-06-08T17:52:21+5:302020-06-08T17:52:35+5:30

हद्दवाढ क्षेत्रातील ८६ कर्मचाºयांचे समायोजन करण्यास मनपा प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे मनपा हद्दवाढ कृती समितीच्यावतीने सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले.

Municipal employees start strike; Affected the functioning | मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू; हद्दवाढ क्षेत्रातील कामकाज प्रभावित

मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू; हद्दवाढ क्षेत्रातील कामकाज प्रभावित

Next

अकोला : महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या हद्दवाढ क्षेत्रातील ८६ कर्मचाºयांचे समायोजन करण्यास मनपा प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे मनपा हद्दवाढ कृती समितीच्यावतीने सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. समितीच्यावतीने शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. नितीन देशमुख तसेच राष्ट्रवादीचे आ. अमोल मिटकरी यांची भेट घेतली असता यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन सेना-राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी दिले.
सप्टेंबर २०१६ मध्ये राज्य शासनाने महापालिकेच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब केले. त्यामध्ये शहरालगतच्या १३ मुख्य ग्रामपंचायती तसेच २४ गावांचा महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत एकूण ८६ कर्मचाºयांना मनपात समाविष्ट करण्यात येऊन त्यांच्यावर तत्कालीन ग्रामपंचायत क्षेत्रातील कामकाजाची जबाबदारी पूर्ववत सोपवण्यात आली. महापालिकेच्या हद्दवाढीचा निर्णय होऊन चार वर्षांचा कालावधी पूर्ण होत असला तरीही अद्यापपर्यंत संबंधित कर्मचाºयांचे महापालिकेच्या आस्थापनेवर समायोजन करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाºयांना अल्प वेतनात महापालिकेची सेवा बजावा लागत आहे. यासंदर्भात मनपा हद्दवाढ कृती समितीच्यावतीने प्रशासनाला तसेच स्थानिक भाजपच्या लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने सादर करण्यात आली; परंतु त्यांच्या निवेदनाला सर्वांनी केराची टोपली दाखवल्याची परिस्थिती आहे. या सर्व बाबी लक्षात घेता मनपा हद्दवाढ कृती समितीच्यावतीने सोमवार ८ जूनपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात कृती समितीच्या बैठकीत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असता सोमवारपासून संबंधित कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. कर्मचाºयांच्या समायोजनाचा मुद्यावर विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी प्रशासनाला पत्र दिले आहे.

सत्ताधारी, प्रशासनाकडून बेदखल
हद्दवाढ कृती समितीच्यावतीने सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. मनपाच्या आवारात जमलेल्या कर्मचाºयांनी प्रशासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. यावेळी प्रशासनाच्यावतीने उपायुक्त वैभव आवारे यांच्याकडून भेट घेतली जाणार होती; परंतु कोरोना संदर्भातील विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात ते निघून गेल्याने त्यांची व कर्मचाºयांमध्ये चर्चा होऊ शकली नाही. सत्तापक्षानेसुद्धा कर्मचाºयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

Web Title: Municipal employees start strike; Affected the functioning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.