विवाहितेच्या खून प्रकरणी सासरच्या मंडळींची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:45 PM2018-05-14T18:45:56+5:302018-05-14T18:45:56+5:30

murder case of Married women, accused aquital | विवाहितेच्या खून प्रकरणी सासरच्या मंडळींची निर्दोष मुक्तता

विवाहितेच्या खून प्रकरणी सासरच्या मंडळींची निर्दोष मुक्तता

Next
ठळक मुद्देअलका शुध्दोधन डोंगरे असे मृत महिलेचे नाव आहे.विवाहनंतर शुध्दोधन डोंगरे त्याची आई व वडीलांनी माहेरवरुन पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरीक छळ सुरु केला होता.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने १२ साक्षीदार तपासले.


अकोला - बोरगाव वैराळे येथील रहिवासी एका विवाहितेच्या  खुनातील आरोपींची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी निर्दोष सुटका केली. बोरगाव वैराळे येथे अलका शुध्दोधन डोंगरे असे मृत महिलेचे नाव असून तीला जाळणाऱ्या शुध्दोधन डोंगरे त्याची आई व वडीलांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
नेर येथील रहिवासी अलका रामधन तायडे या मुलीचे लग्ण फ ेब्रुवारी २०१५ मध्ये बोरगाव वैराळे येथील रहिवासी शुध्दोधन गोवर्धन डोंगरे याच्याशी झाले होता. विवाहनंतर शुध्दोधन डोंगरे त्याची आई व वडीलांनी माहेरवरुन पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरीक छळ सुरु केला होता. सासरी छळ सुरु असल्याचे तीन ेआई- वडीलांना सांगीतले होते, त्यावर काही तोडगा निघण्याआधीच अलका डोंगर (तायडे) ६ सप्टेंबर २०१५ रोजी ती जळाली होती. तीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तीने मृत्यूपुर्व दिलेल्या बयानामध्ये पती शुध्दोधन डोंगरे याने गडवा पडल्याच्या कारणावरुन वाद घातला त्यानंतर त्याचे वडील गोवर्धन व आई पंचफुला या दोघांनी तीला पकडले व शुध्दोधन याने तीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याचे तीने बयाणात नमुद केले होते. या प्रकरणी उरळ पोलिसांनी सदर तिघांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३०४, ३०७ आणि ४९८ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने १२ साक्षीदार तपासले मात्र साक्षीदारांच्या बयानामध्ये आलेली तफावत व परिस्थीतीजन्य पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने तीनही आरोपींची निर्दोष सुटका केली. या प्रकरणी आरोपींच्यावतीने अ‍ॅड. दिलदार खान व फौजीया शेख तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.कीरण खोत यांनी कामकाज पाहीले.

 

Web Title: murder case of Married women, accused aquital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.