पैसे मागितल्याने वृद्ध आईचा खून; मुलीला दोन दिवसांची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:54 AM2021-03-13T01:54:34+5:302021-03-13T01:54:41+5:30
सरुबाई काशिनाथ कांडेलकर (६१) यांना तीन मुलीच असल्याने पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी शेतीवाडी व इतर प्रॉपर्टी त्यांच्या तीनही मुलींना वाटप केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्वप्नशिल्प अपार्टमेंटमध्ये जन्मदात्या आईची मुलीने केवळ एक लाख रुपयांसाठी हत्या केल्याचे उघड झाले आहे. या हत्याकांड प्रकरणातील आरोपी कविता बायस्कर हिला पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयाने तिला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सरुबाई काशिनाथ कांडेलकर (६१) यांना तीन मुलीच असल्याने पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी शेतीवाडी व इतर प्रॉपर्टी त्यांच्या तीनही मुलींना वाटप केली. यामधील कविता बायस्कर (४०) हिला एका शेतजमिनीतील सात गुंठे हिस्सा अधिकचा मिळाला होता. तो कविताने विकला. सरूबाई यांनी कविताकडे त्यातील एक लाख रुपयांची मागितले. सरुबाई यांनी जळगाव जिल्ह्यात घर घेतल्यामुळे त्या अडचणीत होत्या. यावरूनच दोघींमध्ये वाद झाले. याच वादातून बुधवारी कविताने सरूबाई यांचे डोके घरातील पाट्यावर आदळून त्यांची हत्या केली.