सासूची हत्या; आरोपी जावई कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:22 AM2017-10-18T02:22:43+5:302017-10-18T02:23:47+5:30
अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातील बिहाडमाथा येथे जावयाने सासूची हत्या केली व तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला आग्रा येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत आरोपी जावयाची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्रमिला भगवान आठवले (वय ५0) असे मृतक महिलेचे नाव आहे. प्रमिला आठवले यांच्या मुलीचा विवाह उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुन्नेश पुरणचंद निमकाळे याच्यासोबत झाला होता. मुन्नेश हा पत्नी दीपालीचा मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याने दीपाली माहेरी राहत होती. पत्नी दीपालीला सासू प्रमिला आठवले आपल्यासोबत नांदायला पाठवत नाही, याचा राग आल्याने जावई मुन्नेश याने १२ ऑक्टोबर रोजी सासूचा खून केला. याप्रकरणी दीपालीच्या तक्रारीवरून बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात मुन्नेशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटना घडल्यापासून आरोपी मुन्नेश हा गायब झाला होता. पीएसआय चव्हाण यांनी आरोपीला मंगळवारी आग्रा येथून अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपीच्यावतीने अँड. वैशाली गिरी भारती व अँड. केशव एच. गिरी यांनी काम पाहिले.