मुलाची हत्या की सदोष मनुष्यवध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:20 AM2017-07-27T03:20:44+5:302017-07-27T03:20:57+5:30

अकोला : महात्मा फुले नगरात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची हत्या झाली की वडिलाकडून चुकीने त्याच्या डोक्यावर वरवंटा पडला, या संभ्रमात खदान पोलीस आहेत.

Murdered of a child | मुलाची हत्या की सदोष मनुष्यवध

मुलाची हत्या की सदोष मनुष्यवध

Next
ठळक मुद्देपोलीस संभ्रमात : नागपुरात आकस्मिक मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महात्मा फुले नगरात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची हत्या झाली की वडिलाकडून चुकीने त्याच्या डोक्यावर वरवंटा पडला, या संभ्रमात खदान पोलीस आहेत. मानसिक रुग्ण असलेल्या बापाने वरवंटा मारला नसून, तो मुलाच्या डोक्यावर पडल्याचे खदान पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नागपूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर खदान पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
रवींद्र टेकाम यांचा मुलगा सोहम सोमवारी रात्री आजीजवळ झोपलेला होता. मानसिक रुग्ण असलेल्या त्याच्या वडिलांना ही बाब खटकली. त्यांनी चिमुकल्याला जवळ झोपण्याचे सांगितले; मात्र तो झोपला नाही. सोहमचे वडील रात्रीच्या सुमारास घरातील सर्व झोपल्यानंतर मसाला वाटण्याचा पाट्यावरील वरवंटा घेऊन जात होते.एवढ्यात सदरचा पाटा एकाच खोलीत झोपून असलेल्या सोहमच्या डोक्यावर पडल्यामुळे सोहमचा मृत्यू झाला. मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत असलेला पाहून भांबावलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला पोत्यात झाकून ठेवले. एवढ्यात सोहमचे वडील घराबाहेर निघाल्यानंतर आजीला जाग आली. तिने आकांडतांडव करीत नातवाला रुग्णालयात नेले; मात्र गंभीर असलेल्या सोहमला डॉक्टरांनी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला नागपूर येथे दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी बुधवारी संध्याकाळपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल केला नव्हता. नागपूरहून कागदपत्रे आल्यानंतर वडील रवींद टेकाम याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध किंवा हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोहमच्या वडिलांनी त्याच्या डोक्यात वरवंटा मारला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे ही हत्याच आहे, असे म्हणता येणार नाही. सध्यातरी या प्रकरणाचे दस्तावेज नागपूर येथून प्राप्त झाले नसून, दस्तावेज मिळाल्यानंतर सदोष मनुष्यवध किंवा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- गजानन शेळके,
ठाणेदार, खदान पोलीस स्टेशन, अकोला.

Web Title: Murdered of a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.