मूर्तिजापूरचे लसीकरण केंद्र झाले, कोरोना प्रसार केंद्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:14 AM2021-04-29T04:14:08+5:302021-04-29T04:14:08+5:30
मूर्तिजापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरळीतपणे सुरू असलेले लसीकरण केंद्र बदलून, नगरपरिषद अभ्यासिका केंद्रात सुरु करण्यात आले आहे. दोन्ही ...
मूर्तिजापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरळीतपणे सुरू असलेले लसीकरण केंद्र बदलून, नगरपरिषद अभ्यासिका केंद्रात सुरु करण्यात आले आहे. दोन्ही डोससाठी एकाच ठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याने कोरोना संक्रमण अधिक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बुधवारी नागरिकांनी लसीकरण करुन घेण्यासाठी सकाळपासूनच उन्हात रांगा लागल्या होत्या. येथील गर्दी लक्षात घेता लसीकरण केंद्रच, कोरोना प्रसाराचे केंद्र ठरत आहे
शहरात बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून लसीकरणासाठी हजारो लोकांच्या रांगा लागल्या होत्या, लसीकरण केंद्रावर नागरिकांना सावलीत उभे राहण्यासाठी कुठल्याही निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने भर उन्हात तासनतास उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. उन्हामुळे अनेकजण आजारी पडण्याची शक्यता आहे. गत आठ दिवसांपासून या लसीकरण केंद्रावर दररोज प्रचंड गर्दी होत आहे. त्यातही नियमांचे पालन होत नसल्याने ‘ लसीकरण केंद्रच, कोरोना प्रसार केंद्र’ ठरत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना उन्हात तासनतास उभे राहावे लागत आहे. संपूर्ण शहरात कोविड लसीकरण केंद्र एकच असल्याने मोठय़ा प्रमाणात गर्दी वाढत आहे. प्रशासनाने लवकरच उपाययोजना करावी, अन्यथा कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फोटो: मेल फोटोत