मूर्तीजापूर शहर पोलीस ठाण्याला आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:20 AM2021-05-06T04:20:05+5:302021-05-06T04:20:05+5:30

पोलीस अधिकारी, समाजातील निर्माण झालेल्या समस्यांना सोडविण्यासाठी कर्तव्य बजावतात. गुन्हेगारीवर वचक ठेवतात. पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी सहा महिन्यांपूर्वीच ...

Murtijapur City Police Station gets International ISO certification | मूर्तीजापूर शहर पोलीस ठाण्याला आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन

मूर्तीजापूर शहर पोलीस ठाण्याला आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन

Next

पोलीस अधिकारी, समाजातील निर्माण झालेल्या समस्यांना सोडविण्यासाठी कर्तव्य बजावतात. गुन्हेगारीवर वचक ठेवतात. पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी सहा महिन्यांपूर्वीच ठाण्याचा कारभार सांभाळला. शहर पोलीस ठाणे अंतर्गत जवळपास एक लाख लोकसंख्येचा भार असून पोलीस संख्याबळ अपुरे आहे. अशा परिस्थितीत त्यांनी पोलिसांमधील कार्यक्षमता वाढवित, ठाण्याचे भौतिक सुविधा, ऑफिस रेकॉर्ड, प्रत्यक्ष पोलिसिंग, अद्ययावत असे एकूण २४ निकष पूर्ण करून पोलीस ठाण्याला मानांकन मिळवून दिले. औरंगाबाद येथील पारिजात कन्सल्टिंग कंपनीसोबत संपर्क साधून अवघ्या ९० दिवसात या ठाण्याला हा मान मिळाला. ९० दिवसांत ठाण्याची इमारतीचे रंगकाम, कंपाऊंड, लाईट व्यवस्था, संगणकीकरण, बिनतारी संदेश कक्ष, स्टेशन डायरी कक्ष, गुन्हे विभाग कक्ष, मुद्देमाल कक्ष आदी विभाग सुसज्ज केले. १ मे रोजी दिनी पारिजात कन्सल्टिंगचे मुख्य परीक्षक प्रा. प्रशांत जोशी यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांच्या उपस्थितीत ठाणेदार सचिन राऊत यांना आयएसओ प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.

फोटो:

Web Title: Murtijapur City Police Station gets International ISO certification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.