मूर्तिजापूर: शासकीय धान्य गोदामात होणार मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:16 AM2021-01-17T04:16:47+5:302021-01-17T04:16:47+5:30
१०७ मतदान केंद्रांची १४ टेबल्सवर ९ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीला अंदाजे १५ मिनिटे लागण्याची शक्यता आहे. यासाठी ...
१०७ मतदान केंद्रांची १४ टेबल्सवर ९ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीला अंदाजे १५ मिनिटे लागण्याची शक्यता आहे. यासाठी एका उमेदवाराला केवळ एकच मतमोजणी प्रतिनिधी नेमता येणार असून, यासाठीचा अर्जाचा नमुना नामनिर्देशनपत्र सादर करतानाच सर्व उमेदवारांना पुरविण्यात आला आहे.
या नमुन्यातील मतमोजणी प्रतिनिधी नियुक्ती पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावे, सोबत प्रतिनिधींचे दोन फोटो, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून ओळखपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच ओळखपत्राशिवाय उमेदवार, प्रतिनिधींना प्रवेश मिळणार नाही.
मतमोजणी हॉलमध्ये कोणालाही सोबत मोबाइल फोन आणता येणार नसून, हॉलमध्ये चित्रीकरण, रेकॉर्डिंग करण्यास सक्त मनाई असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितली आहे.
--------------------------
सोनाळा येथे दारूची अवैध विक्री वाढली
विझोरा: बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सोनाळा येथे दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे महिलांसह नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गावात भांडण वाढले आहे. याकडे लक्ष देऊन कारवाईची मागणी होत आहे.