मूर्तिजापूर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला; मजूर ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:24 IST2018-02-08T20:18:40+5:302018-02-08T20:24:19+5:30
मूर्तिजापूर : अज्ञात कारने ओव्हरटेक केल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून मजूर जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग सहावर मूर्तिजापूर ते अकोला मार्गावर सोनोरी गावाजवळ ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली.

मूर्तिजापूर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला; मजूर ठार, एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : अज्ञात कारने ओव्हरटेक केल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून मजूर जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग सहावर मूर्तिजापूर ते अकोला मार्गावर सोनोरी गावाजवळ ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली.
मूर्तिजापूर शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी काही मजूर ट्रॅक्टर क्र. एमएच ३७ ए ६६५४ ने साहित्य आणण्यासाठी अकोल्याकडे जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग सहावर मूर्तिजापूर ते अकोला मार्गावर सोनोरी गावाजवळ अज्ञात कारने ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टरवर बसलेला राकेश जगणे (२0) रा. कुडी जि. बालाघाट मध्य प्रदेश हा जागीच ठार झाला, तर एक मजूर गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गजानन महाराज संस्था मूर्तिजा पूरची रुग्णवाहिका व मूर्तिजापूर शहर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी जखमी मजुरास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.