मूर्तिजापूर : ग्रामपंचायत निवडणूक सहा नामनिर्देशनपत्र नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:39+5:302021-01-02T04:15:39+5:30
बुधवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. बुधवारपर्यंत २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २४९ जागेसाठी ६८३ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते. ...
बुधवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. बुधवारपर्यंत २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २४९ जागेसाठी ६८३ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते. त्या नामनिर्देशनपत्रांची छाननी ३१ डिसेंबर रोजी करण्यात आली यात एकूण सहा नामनिर्देशनपत्र नामंजूर करण्यात आले आहेत. यात गोरेगाव येथील ३, हिरपूर येथील ३, असे सहा नामनिर्देशनपत्र नामंजूर करण्यात आले असल्याने आता ६७७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी नामनिर्देशनपत्र, मागे घेण्यासाठी ४ जानेवारीपर्यंत अवधी असल्याने त्याच दिवशी प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या निश्चित होईल. छाननीच्या दिवसाअखेर ९६ प्रभागासाठी ६७७ नामांकन राहिले आहेत, यामध्ये पारद सदस्य संख्या सात उमेदवारी अर्ज २५, भटोरी ९-२५, मंगरूळ कांबे ९-२१, गोरेगाव ९- १९, लाखपुरी ११-३७, सिरसो१३-५४, दुर्गवाडा ७-१९, सांगवी ७-१३, टिपटाळा ७-१३, हिरपूर ११-३७, कवठा (खोलापूर) ७-१४, सोनोरी (बपोरी) ७-७, बपोरी ७-१६, कुरूम १५-४२, माटोडा ७-१६, कवठा (सोपीनाथ) ७-१४, धामोरी बु. ७-२०, कार्ली ७-१४, राजुरा घाटे ७-१७, खांदला ७-१३, धानोरा (पाटेकर) ७-१४, निंभा ९-३३, विराहित ७-२३, मोहखेड ७-८, कंझरा ९-१७, अनभोरा ९-१९, जामठी बु. ११-२९, हातगाव १३-६८, चिखली ९-२४ या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६७७ नामनिर्देशनपत्र सद्य:स्थितीत कायम आहेत.