प्रधानमंत्री अवार्डसाठी मूर्तिजापूर नगर परिषदेची निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 01:41 PM2022-03-08T13:41:44+5:302022-03-08T13:41:55+5:30

Murtijapur Municipal Council : महाराष्ट्रातून एकमेव मूर्तिजापूर  नगर परिषदेची पीएम स्वनिधी पीएम अवार्ड करिता प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

Murtijapur Municipal Council selected for Prime Minister's Award | प्रधानमंत्री अवार्डसाठी मूर्तिजापूर नगर परिषदेची निवड 

प्रधानमंत्री अवार्डसाठी मूर्तिजापूर नगर परिषदेची निवड 

Next

मूर्तिजापूर : प्रशासनिक सुधार आणि लोकतक्रार विभाग यांचेकडून केंद्र शासनाच्या विविध योजने अंतर्गत भारतातील व महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व महानगरपालिका / नगरपरिषदा/ नगर पंचायती यांना पीएम अवार्ड करिता आवेदनपत्र ऑनलाईन करण्या करिता सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी - पीएम स्वनिधी या योजने अंतर्गत मुर्तिजापूर नगर परिषदेने सादर केलेल्या उदिष्ट पुर्तता व उल्लेखनिय कामाच्या आधारावर केंद्र शासनाने भारतातील एकूण ११ महा नगरपालिका व ८ नगरपरिषदा यांची प्राथमिक निवड केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव मूर्तिजापूर  नगर परिषदेची पीएम स्वनिधी पीएम अवार्ड करिता प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

              केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी - पीएम स्वनिधी पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पथपुरवठा सुविधा योजनेची राज्यात अमंलबजावणी करण्यात आली होती. त्याअंतर्गत कोविड १९ च्या कालावधीमध्ये मूर्तिजापूर नगर परिषदे मध्ये या योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करून त्यामध्ये डिसेंबर २०२१ पर्यंत प्रथम कर्ज रु. १०,०००/- हे ३०२ पथविक्रेत्यांना व सदर प्रथम कर्जाची परतफेड केलेल्या पात्र ३६ लाभार्थीना दुसरा टप्पा कर्ज रु. २०,०००/- असे एकूण ३३८ पथविक्रेत्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून व्याजावरील अनुदानास पात्र असे कर्ज वितरीत करण्यात आले होते , तसेच त्यांना मैं भी डिजिटल या मोहिमअंतर्गत विविध बँका व वित्तीय संस्थांकडून क्यू आर कोड देऊन डिजिटल व्यवहार करण्यास प्रशिक्षण देऊन त्यामध्ये त्यांना कॅशबक प्राप्त करून घेण्यासाठी प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित करण्यात आले होते. सदर बाब ही संपूर्ण राज्य व अकोला जिल्ह्याकरिता अभिमानास्पद असून राज्यस्तरावरुन व विविध विभागाकडून मूर्तिजापूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विजय लोहकरे यांचे अभिनंदन व स्तुती करण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत या योजनेचे विभाग प्रमुख सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेश भुगूल यांचे सुध्दा सर्वस्तरा वरुन उल्लेखनिय काम केल्या बददल अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: Murtijapur Municipal Council selected for Prime Minister's Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.