मूर्तिजापूर तालुक्यात ४४ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:11 AM2021-02-05T06:11:45+5:302021-02-05T06:11:45+5:30

मूर्तिजापूर : तालुक्यातील ८६ पैकी ६१ ग्राम पंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण १ फेब्रुवारी रोजी सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. ...

In Murtijapur taluka, 44 gram panchayats are run by women | मूर्तिजापूर तालुक्यात ४४ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती

मूर्तिजापूर तालुक्यात ४४ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती

Next

मूर्तिजापूर : तालुक्यातील ८६ पैकी ६१ ग्राम पंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण १ फेब्रुवारी रोजी सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. तालुक्यातील ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती राहणार आहे. हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरले गेले आहेत.

२०२० ते २०२५ या कालावधीत सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या ग्राम पंचायतींच्या सरपंचपदाचे अनुसूचित जाती, जमातीचे यापूर्वी काढलेले आरक्षण कायम ठेवण्यात आले. आरक्षणाची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत दक्षता घेऊन नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १४ ग्राम पंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले. त्यानंतर उर्वरित ९ सरपंचपदांचे आरक्षण सोडतीने निश्चित करण्यात आले. त्यानुसार कार्ली, धामोरी बुद्रूक, धोत्रा (शिंदे), बोरगाव (निंघोट), सोनोरी (बपोरी), आरखेड, कोळसरा, जांभा बुद्रुक, दहातोंडा, माना, मोझर, एंडली, लंघापूर, वडगाव, सोनोरी (मूर्तिजापूर), किनखेड, सांगवा मेळ, उमरी, रामटेक, राजुरा(सरोदे), कानडी,निंभा, वीरवाडा ही २३ सरपंचपदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी(ओबीसी) आरक्षित झाली. हातगाव, कुरुम कंझरा, कवठा(सोपीनाथ), कवठा(खोलापूर), कुरुम, खरब नवले, खापरवाडा, गाझीपूर, घुंगशी, जांभा खुर्द, जामठी बुद्रुक, दापुरा, दुर्गवाडा, धानोरा वैद्य, धानोरा पाटेकर, पारद, बपोरी, भटोरी, मधापुरी, माटोडा, मुरंबा, मोहखेड, रंभापूर, राजुरा, लोणसणा, वाई(माना), शिवण खुर्द, शेरवाडी, शेलु नजिक, समशेरपूर, सांगवी, सोनाळा, हिरपूर, हिवरा कोरडे, नवसाळ, राजनापूर, शेलू बाजार सांजापूर ही ३८ सरपंचपदे सर्वसाधारण उमेदवारांसाठी आहेत. अपर्णा नीलेश खाडे मुलीने ईश्वरचिठ्ठी काढली. विशाल काटोले व विजय कोंडे यांनी आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले. ८६ पैकी ४४ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच होणार आहेत. ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या महिला सरपंच सोडतीत मूर्तिजापूर तालुक्यात महिलांसाठी उपरोक्त पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. यात अनभोरा, गोरेगाव, आकोली (जहाँगीर) खोडद, जितापूर (खेडकर), दाताळा, दातवी, पोही, ब्रम्ही खुर्द, मुंगशी, सालतवडा अनुसचीत जाती महिला, कव्हळा, नागोली अनुसूचित जमाती महिला, आरखेड, उमरी, कार्ली, किनखेड, कोळसरा, धामोरी बु, बोरगाव (निंघोट), रामटेक, वडगाव, वीरवाडा, सांगवा (मेळ), उमरी (मूर्तिजापूर) नामाप्र महिला, खरब (नवले), गाजीपुर, जामठी बु., दापुरा, धानोरा (पाटेकर), बपोरी, भटोरी, मधापुरी, माटोळा, मुरंबा, मोहखेड, रंभापूर, लोणसना, वाई (माना) शिवण खूर्द, शेरवाडी, शेलु नजिक, शेलू बाजार, समशेरपूर सर्वसाधारण महिला राखीव असा समावेश आहे. मूर्तिजापूर येथे १ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, असलेल्या पीठासीन अधिकारी तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी प्रदीप पवार, निवडणूक नायब तहसीलदार मोहन पांडे, निवासी नायब तहसीलदार राजू डाबेराव उपस्थित होते.

Web Title: In Murtijapur taluka, 44 gram panchayats are run by women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.