मूर्तिजापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:21 AM2021-01-19T04:21:19+5:302021-01-19T04:21:19+5:30

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची मतमोजणी १८ जानेवारी रोजी पार पडली. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती ...

In Murtijapur taluka, Gram Panchayat elections shook the incumbents | मूर्तिजापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा

मूर्तिजापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा

googlenewsNext

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची मतमोजणी १८ जानेवारी रोजी पार पडली. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले असून, तालुक्यातील तीन मोठ्या ग्रामपंचायत प्रस्थापितांना हादरा बसला आहे, तर मतदारांनी यंदा नवीन व तरुण उमेदवारांना संधी दिल्याचे दिसते.

तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी १०७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. २७ ग्रामपंचायतींच्या २३५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २४२ पुरुष व २९२ महिला असे ५३४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २५,३९८ पुरुष व २३,९५३ महिला असे एकूण ४९,३५१मतदार असून यापैकी १८,४८६ पुरुष व १६,२१४ महिला अशा एकूण ३४,७०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पारद, भटोरी, मंगरुळ कांबे, गोरेगाव, लाखपुरी, सिरसो, दुर्गवाडा, सांगवी, टिपटाळा, हिरपूर, कवठा (खोलापूर), बपोरी, कुरूम, माटोडा, कवठा (सोपीनाथ), धामोरी बु., कार्ली, राजुरा घाटे, खांदला, धानोरा (पाटेकर), निभा, विराहित, कंझरा, अनभोरा, जामठी बु., हातगाव, चिखली, या २७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यापैकी सर्वाधिक मतदान व सदस्य असलेल्या कुरुम, हातगाव व सिरसो ग्रामपंचायत निवडणूक निकालांवर सर्व तालुक्याचे लक्ष लागून होते, कुरुम ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे सत्ता असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य व कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वातील सत्ता मोडीत काढून त्यांच्या गटाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. या गटाचे पंचायत समिती उपसभापती व माजी सरपंच उमेश मडगे यांचा पराभूत उमेदवारांत प्रामुख्याने समावेश आहे, येथे बाबूभाऊ देशमुख व सुरेश मालाणी यांच्या नेतृत्वात भाजप-वंचित बहुजन आघाडीने परिवर्तन पॅनलखाली एकत्र निवडणूक लढवून १५ पैकी १३ जागांवर बाजी मारली. १३ सदस्यसंख्या असलेल्या सिरसो येथे माजी सरपंच जयश्री सुरेंद्र मेहरे यांच्यासह त्यांच्या गटालाही पराभव पत्करावा लागला, तर हातगाव ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली असून, १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये नवयुवक पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले, तर इतर विविध पॅनलने विजय मिळविला. भटोरी ग्रामपंचायतमध्ये सतत तिसरांदा डॉ. अमित कावरे यांच्या जनहित विकास पॅनेलने विजयीश्री खेचून आणला यांचे ९ पैकी ५ उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी महिला ओबीसी आघाडीच्या सुषमा कावरे व पंचायत समिती माजी उपसभापती विनायकराव कावरे यांचे पुत्र शेखर कावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हिरपूर येथे सुरेश वऱ्हेकर यांच्या नेतृत्वाखाली ११ पैकी ११ उमेदवार निवडून आले आहे. या निवडणुकीत मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने प्रस्थापितांना हादरा बसला आहे.

Web Title: In Murtijapur taluka, Gram Panchayat elections shook the incumbents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.