मूर्तीजापूर : तिन्ही उमेदवारांना बंडखोरांचे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:05 PM2019-10-05T13:05:59+5:302019-10-05T13:06:08+5:30

बंडाचे दंड थोपटणाऱ्यांना पक्षश्रेष्ठी कसे थंड करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Murtijapur: Three candidates challenge rebels! | मूर्तीजापूर : तिन्ही उमेदवारांना बंडखोरांचे आव्हान!

मूर्तीजापूर : तिन्ही उमेदवारांना बंडखोरांचे आव्हान!

googlenewsNext

दीपक अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : भाजप-सेना, राष्ट्रवादी आणि ‘वंचित’ या तिन्ही पक्षांच्या बंडखोरांनी निवडणूक मैदानात दंड थोपटल्याने तिन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना मूर्तिजापूर मतदारसंघात फटका बसण्याचे संकेत आहेत. आता अर्ज माघार घेण्यापर्यंत बंडाळी थोपविण्याचे आव्हान पक्षातील नेत्यांसमोर आहे. यामध्ये कोणत्या पक्षाला किती यश येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उमेदवारी दाखल करण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी मूर्तिजापूर मतदारसंघात २४ उमेदवारांनी ३२ नामांकन दाखल केले. यामध्ये सहा बंडखोर आणि १४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा मूर्तिजापूर मतदारसंघात उतरले आहेत.
त्यांना भाजपच्याच राजकुमार नाचणे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आव्हान दिले. युतीतील शिवसेनेचे उमेदवार महादेव गवळे आणि शिवसेना नगरसेवक आशिष बरेदेखील मैदानात दंड थोपटून तयार आहेत. अशीच काही परिस्थिती राष्ट्रवादीसमोरही तयार झाली आहे. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवी राठी यांच्यासमोर शुद्धोधन खिराडे आणि तुषार दाभाडे यांनी बंडाचा झेंडा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांच्यासमोर अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शरद गवई आणि सम्राट डोंगरदिवे उभे ठाकले आहेत. त्यामुळे पक्षाचे अधिकृत तिकीट मिळूनही उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. बंडाचे दंड थोपटणाऱ्यांना पक्षश्रेष्ठी कसे थंड करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. दोन दिवसांत जर बंडाळी शांत करण्यात कोणत्या पक्षाला यश येते, हे काळच ठरविणार आहे. त्यामुळे मूर्तिजापूर मतदारसंघांत बहुरंगी लढत रंगण्याचे संकेत मिळत आहेत.
पक्षांतर्गत रुसवे-फुगवे दोन दिवसांत काढल्या जातात की ही नाराजी निवडणुकीत कायम राहते, हे सर्व पक्षांतील मातब्बर पुढाºयांच्या डावपेचावर अवलंबून आहे. दोन दिवसांत रिंगणात असलेल्या किती उमेदवारांची मनधरणी करण्यात येते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, भाजप आमदाराच्याविरोधात रणशिंग फुंकणाºया शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहतात का? याबाबत राजकीय चर्चा होत आहे.

Web Title: Murtijapur: Three candidates challenge rebels!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.