इंदूर-अमरळनेर बस अपघातातील मृतकांमध्ये मूर्तिजापूरच्या महिलेचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 04:42 PM2022-07-18T16:42:29+5:302022-07-18T16:43:49+5:30
Indore-Amaralner bus accident News : १३ मृतकामध्ये मूर्तिजापूर येथील अरवा मुर्ताझा बोहरा (२७ वर्षे ) यांचा समावेश आहे.
-संजय उमक
मूर्तिजापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अमळनेर आगाराच्या बसला इंदूर वरुन अमळनेर कडे येत असताना बस पुलावरुन नदीत कोसळून अपघातात झाला त्यात १३ लोकांना जल समधी मिळाली, त्या १३ मृतकामध्ये मूर्तिजापूर येथील अरवा मुर्ताझा बोहरा (२७ वर्षे ) यांचा समावेश आहे.
इंदूर वरून अमळनेर कडे येणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस क्रमांक एमएच ४० एन ९८४८ ही १८ जुलै रोजी येत असताना खलघाट मधील नर्मदा नदी पुलावरून बस थेट नदीत कोसळली यात अनेक स्त्री पुरुष मृत्यूमुखी पडले. मूर्तिजापूर येथील अरवा मुर्ताझा बोहरा (२७) या मूर्तिजापूर वरुन इंदूर येथील आजारी मावशीला भेटायला गेल्या होत्या, १८ जुलै रोजी इंदूर वरून आपल्या माहेरी अमळनेर येथे जाण्यासाठी अपघातग्रस्त बस मधून प्रवास करीत होत्या परंतु बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. अरवा बोहरा यांचे मूर्तिजापूर येथील हुसैनी हार्डवेअरचे मालक हुसैन उर्फ अख्तर अकबर अली सैफी यांचा लहान मुलगा मुर्ताझा हुसैन सैफी यांच्या सोबत २०१८ विवाह साली झाला. अरवा यांचे माहेर अमळनेर असल्याने त्या इंदूर वरुन एकट्याच अमळनेरसाठी प्रवास करीत होत्या, एक दिवस माहेरी थांबून १९ जुलै रोजी त्या मूर्तिजापूर येथे परत येणार होत्या परंतु नियतीला ते मान्य झाले नाही. त्यांच्यावर मधातच काळाने झडप घातली, त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूची वार्ता मूर्तिजापूर येथे समजताच सर्वत्र शोककळा पसरली.