मुर्तिजापूर : माना फाट्याजवळ झालेल्या अपघातातील जखमी रेल्वे पॉइंटमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 08:35 PM2018-01-30T20:35:39+5:302018-01-30T20:40:35+5:30
कुरुम (मुर्तिजापूर): भरधाव ट्रकच्या धडकेत ऑटोतील आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार, २९ जानेवारी रोजी माना फाट्याजवळ घडली होती. यामध्ये माना रेल्वे स्टेशनमध्ये पॉइंटमन म्हणून कार्यरत असलेले महादेव नारायण बांदेकर हे सुद्धा जखमी झाले होते. सोमवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क

महादेव बांदेकर व त्यांची पत्नी तारा बांदेकर हे सोमवारी मूर्तिजापूर येथून माना येथे ऑटोने जात होते. यावेळी माना फाटा येथे त्यांच्या ऑटोला ट्रकने जबर धडक दिली होती. बांदेकर दाम्पत्यासह आठ जण गंभीर जखमी झाले होते. महादेव बांदेकर यांचा सर्वोपचार रुग्णालयात रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.