मुश्ताक अली टी-२० स्पर्धा; विदर्भ क्रिकेट संघात अकोल्याचे तीन खेळाडू
By रवी दामोदर | Published: October 13, 2023 01:42 PM2023-10-13T13:42:16+5:302023-10-13T13:45:39+5:30
अथर्व तायडेची कर्णधारपदी निवड : दर्शन नळकांडे, नयन चव्हाण यांचा संघात समावेश
रवी दामोदर, अकोला
अकोला : बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या सय्यद मुस्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेकरीता विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली असून, या संघात अकोला क्रिकेट क्लबच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. विदर्भ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अकोल्याच्या अर्थव तायडेची वर्णी लागली आहे.
पंजाब राज्यातील मोहाली येथे दि.१६ ते २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सय्यद मुश्ताक अली टी - २० क्रिकेट स्पर्धा होणार आहे. विदर्भ संघात अकोल्याचे अथर्व तायडे, दर्शन नळकांडे आणि नयन चव्हाण या ३ खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामध्ये फलंदाज अर्थव विदर्भाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. दर्शन नळकांडे हा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज त्याने १९ वर्षाखालील भारतीय संघाचे इंग्लंड येथे प्रतिनिधित्व, रणजी ट्रॉफी तथा आय. पी. एल संघाचे ५ वर्षापासून प्रतिनिधित्व करीत आहे आहे. तसेच नयन चव्हाण फलंदाज तथा फिरकीपटू आहे. खेळाडूंना अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अशोक तापडिया, उपाध्यक्ष गुरमंदरसिंग छतवाल, सचिव ओम्रकाश बाजोरिया, सहसचिव नरेंद्र पटेल, ऑडीटर मधुकर घोंगे, कर्णधार जावेदअली, सदस्य श्रीराम झुनझुनवाला, शरद अग्रवाल, मनोहर अगडते, तसेच अकोला क्रिकेट क्लब व जिल्हा हौशी क्रिकेट संघटनाचे मार्गदर्शन लाभले आहे.
विदर्भ संघ ग्रुप ‘डी’मध्ये
मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत विदर्भ संघ ग्रुप ड मध्ये असून, त्याचा सामना ग्रुप मधील बंगाल, झारखंड, उत्तराखंड, महाराष्ट्र, पोन्डेचेरी, राजेस्थान या संघासोबत होणार आहे. गेल्या १० वर्षात क्लबच्या खेळाडूंनी खेळात सातत्य ठेवून अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नांव राष्ट्रीय / आंतराष्ट्रीय स्तरावर नेले आहे.