संगीत मैफलीने ‘व्हाट्स अँप ग्रूप’ची वर्षपूर्ती साजरी
By admin | Published: March 18, 2015 11:29 PM2015-03-18T23:29:01+5:302015-03-18T23:29:01+5:30
चिखली येथे व्हाट्स अँप ग्रूपची वर्षपूर्ती; उत्कृष्ट पोस्ट टाकणा-यांना पुरस्कार.
सुधीर चेके पाटील/ चिखली (बुलडाणा): व्हाट्स अँप या सर्वाधिक लोकप्रीय सोशल अँपवर ग्रूप तयार करून माहिती व विचारांची देवाण सुरू असते. या ग्रूपचा अँडमीन हा सदस्यांसाठी नेहमीच मनोरंजनाचा विषय असतो. अमुक कारणासाठी अँडमीनने पार्टी द्यावी, यासंदर्भात सर्वच ग्रूपमध्ये नेहमीच मॅसेज पोस्ट केले जातात; मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. तो केवळ विनोदाचा भाग म्हणून घेतले जाते. मात्र चिखली शहरातील संगीतप्रेमी मंडळींनी गत वर्षी तयार केलेल्या ह्यआम्ही संगीतप्रेमी चिखलीकरह्ण या नावाने व्हाट्स अँप ग्रूपची वर्षपूर्ती ह्यस्नेहमिलन संगीत प्रेमींचेह्ण हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करून सोमवारी उत्साहात साजरी केली.
संगीत क्षेत्राशी निगडीत व संगीतप्रेमी मंडळींनी १६ मार्च २0१४ रोजी व्हाट्सअँपवर संगीताच्या विषयाची माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी आम्ही संगीतप्रेमी चिखलीकर या नावाने एक ग्रुप बनविला होता. ग्रूपच्या माध्यमातून वर्षभर संपर्कात राहणार्या ग्रूपमधील सदस्यांनी ग्रूपच्या वर्षपूर्तीनिमित्त स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना मांडली. एरव्ही अशा प्रकारच्या पोस्टकडे केवळ टाईमपास म्हणून पाहिले जात असले तरी, यंदा ती कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पाहता-पाहता ग्रूपमधील सदस्यांनी एक-एक जबाबदारी घेतली. सर्वांच्या पुढाकारातून एसपीएम महाविद्यालयात स्नेहमिलन संगीत प्रेमींचे हा सुरेल संगीताचा कार्यक्रम १६ मार्च रोजी पार पडला. यावेळी मराठी, हिंदी भक्तीगीते, भावगीत, गझल, नाट्यगीतांचे सादरीकरण करण्यात आले. या बहारदार संगीत मैफलीत भिमरावशास्त्री पवार, पार्थ औटी, कु.राधीका ठाकुर, कु.पूजा ढोकणे, राजेंद्र डांगे, निलकंठ औटी, पंकज रसाळ यांनी अत्यंत सुमधूर गाणी सादर केली. व्हाट्सअँप ग्रूपवर सदस्यांनी टाकलेल्या पोस्ट, फोटो, ऑडीओ, व्हिडीओंपैकी उत्कृष्ट पोस्ट निवडून सदस्यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक योगदानासाठी सेवा संकल्पचे नंदकुमार पालवे यांना सेवा गौरव पुरस्कार, उत्कृष्ट व अर्थपूर्ण फोटोसाठी वैदेही असोलकर, उत्कृष्ट गाण्यासाठी सतील लंबे, उत्कृष्ट व्हिडीओ क्लीपसाठी कु.निकीत गुंजाळकर, उत्कृष्ट मॅसेजसाठी सोलापूरचे गिरीष पंचवाडकर, तसेच भागवत इरतकर यांना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक ग्रूप अँडमिन प्रसाद रघुनाथ कंगले यांनी केले.