लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:16 AM2021-05-17T04:16:32+5:302021-05-17T04:16:32+5:30

--बॉक्स-- माझं माहेर माहेर --कोट-- माझे माहेर अमरावती जिल्ह्यात असून आरोग्याच्या दृष्टीने माहेरपेक्षा कुटुंब महत्त्वाचे आहे. तसे पाहिले तर ...

My mother-in-law is happy for Leki's Mahera ... | लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...

Next

--बॉक्स--

माझं माहेर माहेर

--कोट--

माझे माहेर अमरावती जिल्ह्यात असून आरोग्याच्या दृष्टीने माहेरपेक्षा कुटुंब महत्त्वाचे आहे. तसे पाहिले तर गाडीवर एकाच दिवसात जाऊन परत येता येते; मात्र कोरोना संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून मला माहेरी जाता आलेले नाही.

- चेतना शेंद्रे

--कोट--

कोरोना संसर्ग कधी, कुठे होईल हे सांगता येत नाही. मुलेही लहान असल्याने माहेरी गेलेली नाही. कोरोना लवकर संपुष्टात आल्यास माहेरी जाता येईल.

- दीपशिखा शेगोकार

--कोट--

माझे माहेर बाळापूर येथील आहे. येथे जाण्यासाठी नियमित एसटी बसेस सुरू नाही. त्यात गेलेच तर परत येण्याची सुविधा नाही. कोरोना वाढतच असल्याने माहेरी जाण्याची ओढ लागली आहे.

- वैशाली शिरसाठ

--बाॅक्स--

लागली लेकीची ओढ

--कोट--

माझी मुलगी वाशिम येथे आहे. ती दिवाळीच्या जवळपास आली होती. त्यावर पुन्हा कोरोना वाढल्याने येताच आलेली नाही. माझी दोन्ही नातवंडे लहान आहेत. सारखे मामा मामा करतात. त्यांना येता येत नाही.

- शोभा गावंडे

--कोट--

माझी मुलगी मूर्तिजापूर तालुक्यात दिली आहे. कोरोनामुळे मुलीला बरेच दिवस झाले येता आले नाही. नातवंडांची येण्याची आस लागली आहे. संचारबंदी हटल्यास त्यांना येता येईल.

- मंदा गावंडे

--कोट--

माझी मुलगी अधूनमधून येत असते, परंतु मीच आता कोरोना वाढला असल्याने स्वत:ची काळजी घेत काही दिवस न येण्याचा सल्ला दिला आहे. मुलगी माहेरी आल्यावर मन भरून येते.

- केसर गवई

--बॉक्स--

मामाच्या गावाला कधी जायला मिळणार?

--कोट--

मामाच्या गावाला गेल्यावर खेळण्याची, खाऊ खाण्याची नुसती धमाल असते. पण कोरोनाने पप्पा-मम्मी गावाला जायला नको म्हणतात.

- सम्यक वाहुरवाघ

--कोट--

आमच्या मामाचे गाव दुसऱ्या राज्यात आहे. त्यामुळे कमीच वेळा जातो. तेथे गेल्यावर खूप मज्जा करतो. पण कोरोनाने जाताच आले नाही.

- पायल ढगे

--कोट--

आमचा मामा मला पाहिजे तो खाऊ देतो. गावात गाडीवर कुठेही फिरायला मिळते. शिवाय अभ्यासाचे टेन्शन नसते.

- युवराज पराते

Web Title: My mother-in-law is happy for Leki's Mahera ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.